पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण ३७ ठरवून तो अमलांत आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. याप्रमाणे जरूर ती तयारी करून आपण व्यवस्थित प्रयत्न करू लागलों म्हणजे सर्व गोष्टी आपोआप आपल्या हाती येतील. आपण खटपट न करता ते आपणांस देणगी म्हणून मिळेल असे जर लोक समजतोल तर ते मिळण्यास फार काळ लागणार आहे. ज्याप्रमाणे परमात्म्यापासून उत्पन्न झालेली सृष्टि शेवटीं परमात्म्यांतच लय पावणार व याप्रमाणे मोक्ष हा सृष्टीच्या प्रलय काली सर्वांनाच मिळणार, पण इतका दम नाही म्हणून साधक अनेक साधने करून लवकर मोक्ष मिळेल असा प्रयत्न करतात; त्याप्रमाणे स्वाभा. विक परिपाकाने एक दिवस स्वराज्य मिळेल; पण तोपर्यंत आपण म्हणजे हिंदी समाज जगतो कां मरतो हे निश्चित सांगता येत नाही व तितका आपणांस दम नाही म्हणन आपण प्रयत्न करून ते लवकर या पिढीच्या हयातीतच मिळेल अशी खटपट करावयाची आहे, 'याचि जन्मी याचि डोळां भोगीन तो सुखसोहळा' अशा निश्चयाने आपण कामास लागले पाहिजे, कानडा, आस्ट्रेलिया वगैरे देशांना नोकरशाहीच्या विरोधाची अडचण आपल्याप्रमाणेच होती. पण जुटीने कामें करण्याच्या त्यांच्या संवयीने त्यांना त्या नोकरशाहीच्या जांचांतून सुटता आले, आयलंद जवळ पडले म्हणून त्याला ही सोडवणूक होण्याला फार कष्ट पडले; पण त्यानेहि अखेर संघशक्तीच्या जोरावरच आपले उद्दिष्ट गांठले. या कामासाठी जपानने आपल्यांतील विद्वान् माणसे परदेशी जाऊन त्यांच्या संस्था, शिक्षणपद्धति, कामाची व्यवस्था व सामाजिक मांडणी यांचा अभ्यास करण्यासाठी व माहिती गोरा करण्यासाठी पाठविली. या माणसांनी निरनिराळ्या देशांतून पुष्कळ माहिती आणली व मग त्या माहितीचा खल करून आपल्या परिस्थितीशी व परंपरेशी जी माहिती किंवा जे अनुभव जुळते व उपयुक्त दिसले त्यांचे आपल्या व्यवस्थेत मिश्रण करून त्यांनी आपली राज्यपद्धति, व्यापाराचे धोरण, कारखान्यांची व्यवस्था, सामाजिक संबंध यांची मांडणी केली. याप्रमाणे जपानने आपली स्थिती सुधारली आहे व हा कित्ता हिंदुस्थानाने आपल्यापुढे ठेवून काळजीपूर्वक आपली परिस्थिति व परंपरा यांना अनुसरून गिरविला तर हिंदुस्थानाचेंहि कल्याण होईल. यासाठी निवडक माणसे