पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ भावी हिंदी स्वराज्य प्र०२ दोन खात्यांच्या खर्चाच्या तजविजीसाठी तिसरे मुल की खाते; म्हणजे संपलें सरकार. न्यायखात्यांत पोलीस, तुरुंग, यांचा समावेश होतो व लष्करी खात्यांत सैन्य, आरमार, विमाने यांचा अंतर्भाव होतो, याखेरीज सरकार हल्ली हिंदुस्थानांत जी कामें करते ती सर्व लोकोपयोगी कामें जनतेने संघशक्तीने करावयाची असतात. सारांश, सरकार व जनता ह्या एकमेकांना पूरक अशा दोन संस्था असतात. यासाठी त्या स्वराज्यांत एकमेकांस मदत करीत असतात व त्या अशा एकमेकांना मदत करू लागल्या म्हणजे राष्ट्रीय सामर्थ्य, सार्वजनिक धंदे व सामाजक स्वातंत्र्य उत्तम त-हेने संपादन होतात. पण हिंदुस्थानांत सरकारचा हेतु व लोकांच्या आकांक्षा एक नाहीत, यामुळे सर्व शक्ति सरकारच बळकावून बसले आहे व दोहोंची एकवाक्यता करणारी शक्ति अन्तित्वात नाही.जर राष्ट्रापुढे एखादी घटना, सर्व लोकांस संमत असे एखादें ध्येय व तें ध्येय पार पाडण्यासाठी लागणारी संघशक्ति असती तर हे काम सुलभ झाले असते. पण सर्वसंमत असें ध्येयच नसल्याने जनतेच्या हातून कांहींच कार्य होत नाही असे झाले आहे. लोकांच्या अंगचे पाणी खेळते नसून डबक्याप्रमाणे सांचून घाण होत आहे व त्यापासून हित होण्याऐवजी अनहित मात्र होत आहे. एक साध्य व त्या साध्याची स्पष्ट कल्पना जनतेपुढे नसल्याने जे काही थोडे बहुत प्रयत्न होतात त्यांना चोहोकडे अनेक फांटे फुटून गणपति करतांना त्याचा मारुति किंवा सूत करतांना भूत होऊन तो जनतेच्या बोकांडी बसण्यास पहातो असा प्रकार होत आहे. यासाठी असें ध्येय लोकांपुढे मांडणे जरूर आहे. अशा प्रकारें अतःपर कामाची घाण, सामर्थ्याचा अपव्यय व पुढाऱ्यांची फजीति होऊ नये म्हणून हिंदुस्थानाच्या साध्याचा स्पष्ट नकाशा व त्या नकाशाची देश व काल यांना अनुसरून व्यवस्थित मांडणी करण्याकडे आपल्याला लक्ष पुरविले पाहिजे व अशा प्रकारच्या मांडणीची रूपरेखा या पुस्तकांत दाखल केली आहे; ती पुढे क्रमशः येईल. या कामाला सरकारची मदत झाली तर त्यांत ग्रेट ब्रिटनची मोठी कीर्तीच होणार आहे. पण गेल्या शंभर वर्षांचा कारभार लक्षात घेतां या कामी सरकारची मदत मिळेल अशी अपेक्षा धरवत नाही. यासाठी लोकांनीच आपल्या साध्याची रूपरेखा