पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण . ३५ रकमांचा समाईक भांडवलाच्या कंपनीप्रमाणे सर्व व्यवहार होऊन तो प्रसिद्ध होईल तर जनता या पुढाऱ्यांबद्दल अभिमानाने व कौतुकानें स्मरण ठेवणार नाही ही गोष्ट शक्य नाही. जनतेचा आदर संपादण्यासाठी आदरणीय वर्तन पाहिजे, असें वर्तन असल्यावर त्या पुढाऱ्याबद्दल जनतेला अभिमान वाटणारच, नाना FTERESशाचकाई सरकार ज्या ज्या ठिकाणी देशहिताचे काम करील तेथे तेथे पुढाऱ्यांनी व जनतेने त्याला योग्य मदत करावी. मात्र ही मदत करतांना आपण काय करतो व यापासून खरें देशहित होईल अशी खात्री करून घेत जावी. नाहीतर जनतेच्या पुढान्यांनी फुकट कामें लरावी व हे वांचलेले पैसे भलतीकडेच उधळले जावे असे होईल. ज्या ठिकाणी सरकार देशहिताचे काम करणार नाही तेथे लोकांनी स्वतः ते करावें. वर जी समाईक भांडवलाची कंपनी सांगितली-जिला हिंदी राष्ट्रीय हितसंवर्धक कंपनी म्हणता येईल त्या कंपनीने ही सर्व कामें आपण करावी. यासाठी लागणारा पैसा तिच्या हाती आहेच व लागणारी माणसें-हिंदी माणसें-तिने तयार करवावी. राष्ट्र म्हणजे मागल्या भागांत सांगितलेल्या सर्व संघांचा संघ होय. देशांतील सर्व लोक या संघाचे सभासद असून अन्न, वस्त्र वगैरे अवश्यक वस्तूं खरीज देशांतील सर्व मालमत्ता ही या संघाची मालमत्ता होय. लोकांचे सर्व पुढारी हे त्या मालमत्तेचे संरक्षक (ट्रस्टी) होत व हे काम त्यांनी परमेश्वरसाक्ष प्रामाणिकपणे केले पाहिजे, अशा सर्व देशांतील मालमत्तेची वहिवाट करणाऱ्या पुढारी मंडळालाच खरोखर राज्यव्यवस्था असें नांव आहे. पण हिंदुस्थानांतील राज्यव्यवस्था परकी असल्यामुळे स्वराज्यासाठी आपणांस आज अशी व्यवस्था करावी लागत आहे, कोणत्याहि देशांत आपण गेलो तरी आपणांस असेंच आढळन येईल की, सगळ्याच गोष्टी कांहीं सरकार करीत नसते व सगळ्याच गोष्टी सरकारने करण्याचे अंगावर घेऊं नये असेंहि शासनशास्त्रकारांचे म्हणणे आहे. सरकारने फक्त लोकांमधील भांडणांचा बंदोबस्त करावा. देशांतील देशांत राहणारे लोकांमधील आपसांतील तंटे व या देशचे लोक व परदेशचे लोक यांच्यामधील तंटे तोडण्याचे काम सरकारने करावयाचे असते. सारांश, सरकार म्हणजे न्याय व सैन्य ही दोन खाती होत व या