पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य । प्र०२ आहेत असे समजावे. त्यांचे उदाहरण शहाण्या माणसांनी केव्हांहि गिरवू नये. फार घाई असेल तेव्हां मोटारने जावें, पण एरवी सर्व पुढाऱ्यांनी मोटार वर्ज समजली पाहिजे व याचप्रमाणे प्रत्येक चैनीला फांटा दिला पाहिजे व आपली फालतू संपत्ति देशहितार्थ खर्च केली पाहिजे, म्हणजे देशहित होण्याला फार उशीर लागणार नाही. हिंदुस्थानाचे हित होण्यासाठी काय झाले पाहिजे हे प्रत्येक जाणत्या माणसास समजण्यासारखे आहे. हिंदुस्थान गरीब असल्यामुळे त्याचा खर्च गरीबीला साजेसा पाहिजे. सर्व चैनीच्या वस्तू ही गरीबी जाईपर्यंत वजे केल्या पाहिजेत. देशहिताची कामें फुकट केली पाहिजेत. स्वराज्यांत सर्व सरकारी कामें अगदी थोड्या वेतनावर करावी लागतील यासाठी या गोष्टीचा अभ्यास म्हणून मोठे पगार घेणाऱ्या लोकांनी आपले फालतू पगार देशहिताच्या कामाकडे खर्च केले पाहिजेत. इंग्रज सरकारचे काम लोकांनी केव्हांहि कमी पगारावर अगर फुकट करूं नये; कारण अशा रीतीने वांचलेले सर्व पैसे इंग्रज अधिकारी जास्त नेमण्यांत अगर त्यांचे पगार वाढविण्यांत खर्च होतात. आपण या गोऱ्या कामगाराइतकाच पगार व्यावा पण मग तो आपण राष्ट्र कार्याकडे खर्च करावा. हायकोट जज किंवा काउन्सिलरपासून ते पांचशे रुपये पगारापर्यंतचे सर्व हिंदी अधिकारी शहाणे, देशहिताची कळकळ बाळगणारे असले पाहिजेत व त्यांनी पांचशे रुपयांपेक्षा जास्त मिळणारे पैसे देशकार्यार्थ दिले तर वाटेल तितके देशकार्य करता येईल, डॉक्टर, वकील, व्यापारी वगैरेंनी देखील हा कित्ता गिरविला पाहिजे. हल्लींची 'हिंदुस्थान देश दरिद्री आहे' वगैरे भाषण वर्तनाच्या कसाटीने मानभावीपणाची ठरतात. अशा रीतीने जनतेने देशहित करण्याचा निश्चय केला आहे असे दिसले म्हणजे सरकार आपोआप त्या कामाला मदत करील. शिवाय उत्पन्नाला अशा त-हेने सत्कार्थी खच करण्याचा आळा बसला म्हणजे लांचलुचपत, जुलूम, निर्दयपणा वगैरे उपायाना पैसे मिळविण्याची इच्छाच होणार नाही. याप्रमाणे उत्पन्न झालेल्या पशावर योग्य जमाखर्च, प्रत्येक रक्कम त्या त्या इसमाचे नांवे जमा. ती ज्या धंद्यातला होईल त्यांत होणाऱ्या नफ्याचा त्यास किंवा त्याच्या कुटुंबास अडचणी वेळी देणें अगर फिरून जमा करणे वगैरे गोष्टी झाल्या पाहिजेत.