पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण आपलें कल्याण व्हावे असे आपणास वाटत असेल तर कल्याणकारकच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. बर्फीत ठेवून जिन्नस ऊन झाला असे कधीही होत नाही. हिंदुस्थानची आजची कृति तशा प्रकारची आहे. हिंदुस्थानांतील लोकांची ऐपत थोडी, ते फार गरीब आहेत असे प्रत्येक जण म्हणतो, पण इंग्लंडसारख्या श्रीमंत देशांतील लोकांची रहाणी व चैन यांचे सेवन प्रत्येक जण करतो! मग हा दारिच जाण्याचा उपाय फलद्रूप न झाला तर आश्चर्य काय ? मोठे लोकच स्वतःच्या आचरणाने असे चुकीचे धडे घालून देतात. राष्ट्रीय पुढारीच या चैनीच्या जिनसांचा उपयोग करतात. हिंदुस्थानांतील दारिद्य या विषयावर व्याख्यान देणारे पुढारी मोटारीने प्रवास करतात. सोडा वाटर पितात व विलायती थाटाचा पोषाक करतात. दारियाचे हे काय लक्षण की दारिद्र्याचे ढोंग? दरिद्री देशांतील पुढाऱ्याने त्या देशाच्या ऐपतीस साजेल असा आचार, पोषाक वगैरे करण्याचे उदाहरण घालून देण्याचे सोडून जर निरर्थक थाट केला तर लोक काय शिकतील ? ज्या ठिकाणी सहज पायीं किंवा फुकट पालखीतून जातां येईल तेथे मोटार ! बिनपैशाने मिळणाऱ्या बिनमोल पाण्याऐवजी दीड आण्याचा सोडा! थोड्या खर्चाचा, साधा, अभिमान बाळगण्यायोग्य देशी पोषाकाऐवजी भारी खर्चाचा, देशी रिवाजाला विसंगत, विलायतला पैसे पाठविणारा साहेबी पोषाक पाहिल्यावर लोकांना काय उपदेश करावयाचा व कोणच्या तोंडाने नांवे ठेवावयाची ? पुढाऱ्यांनी घालून दिलेला हा कित्ता जनतेने सिनेमा, मोटार, दारू, चहा, वगैरे जिनसांना उदार हाताने उत्तेजन देऊन गिरविला तर तिला काय दोष देता येईल ? गरीब आंधळ्याला पैसा नाही म्हणणारा पुढारी इस रीसाठी दोन आणे, दाढी करण्यासाठी चार आणे, रुमाल व सेंटसाठी आठ आणे खर्च करतांना पाहून लोक काय शिकतील ? पुढाऱ्यांना असा निरर्थक खर्च करणे शोभत नाही. पुढारी श्रीमान आहेत, पण या पैशांचे काय व रावे हे त्यांना समजत नाही की काय, म्हणून ते अशी उधळपट्टी करून भलतें उदाहरण घालून देतात ? जोपर्यंत आपल्या देशांतील सर्व लोकांना पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळणार नाही तोपर्यंत सर्व पुढाऱ्यांनी अगदी साधी व गरीबीची रहाणी ठेवली पाहिजे. असे न करतील ते लोकांचे पुढारी नसून शत्रु प्रछन्न शत्रु भा...हिं...स्व...३