पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ भावी हिंदी स्वराज्य [प्र०२ असाच सुखकर अनुभव आणून देणे हे काम पुढारी करतील तर त्या बाबींतहि खटपट न करतां संघ उत्पन्न होतील. पुढारी राहतात ती आळी, पुढारी राहतात ती पेठ, पुढारी राहतात ते गांव त्यांनी संघशक्तीने सुधारलें असें दिसले तर इतर लोक या कामी मागे राहणार नाहीत. पण वर्गणी द्यावी, सभासद व्हावे, काम करूं नये व काम केले तर समजू नये असे झाले म्हणजे लोकांना साहजीकच संघ वगरे संस्थांचा कंटाळा येतो. कारण खिसा हलका झाला याशिवाय जास्त अनुभव त्यांना येत नाही व निरर्थक खिसा रिकामा व्हावा असे कोणास वाटत नसते. सिनेमाला लोक पैसे देऊन जातात, चहासारखी अपायकारक द्रव्ये ते पैसे खर्च करून पितात पण राष्ट्र कार्याला मात्र वर्गणी देत नाहीत, याचें कारण हेच की, राष्ट्रकार्यापासून झालेलें सुख त्यांच्या अनुभवास येत नाही. हे सुख अनुभवास येईल असे केले पाहिजे. अगदी ढोवळ गोष्टी, की ज्यांचा अनुभव लवकरच येईल, अशा गोष्टी घुढाऱ्यांनी पहिल्याने हाती घेतल्या पाहिजेत. एका वर्षांत स्वराज्य मिळवून देतो म्हटल्याबरोबर जनता एक कोट रुपये देऊन त्या स्वराज्यासाठी किती उत्सुकतेने काम करीत होती याचा अनुभव प्रत्येकास आहेच. स्वराज्य मिळवावयाचे असेल तर राष्ट्रीय शाळेतील मुलांनी गुरुजी नसतांना सुद्धां दंगा करूं नये, गप्प बसावे असे ऐकल्यावर चार महिनेपर्यंत मुलांनी तें व्रत चालविल्याचा अनुभव लेखकास आहे. इतकी स्वराज्य मिळविण्याबद्दल जनतेत उत्सुकता होती. पण शेवटी ते अनुभवास न आल्याने सर्वच घडी बिघडली. अशा त-हेने लोकांचा उत्साहभंग होईल असे करूं नये. दहा रुपये फायदा होईल असा अंदाज असला तर दोन रुपये मिळतील असे सांगावें. आणि ते दोन रुपये बिनचूक मिळाले पाहिजेत, म्हणजे जनतेला काम करण्यांत, अधिक झटून काम करण्यांत उत्साह वाटेल, शामा जगाची परिस्थिति, जगाचा अनुभव, कालाचा ओघ, परमेश्वरी इच्छा यांचा विचार न करतां जर आपण वाणूं लागलों तर अशा वागण्याने नाशच होणार. सृष्टीला क्षमा ठाऊक नाही. तुम्ही कोणत्याही कारणाने वाईट कृत्य केल्यास त्याचा वाईट परिणाम तुम्हांस भोगावा लागेल, हा परमेश्वरी नियम आहे व त्यांत फेरबद्दल कोणालाहि करता येत नाही.