पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण जनतेला आपले म्हणणे पटवावे लागते व असे म्हणणे पटलें म्हणजे मग ती त्याप्रमाणे वागते. यासाठी ज्याला ज्याला जनतेत आपल्याविषयी अभिमान उत्पन्न व्हावा असे वाटत असेल त्याने जनतेला स्पर्श करील असे काम केले पाहिजे. आपले देशबंधु म्हणून एकमेकांवर प्रेम करण्याचा धडा आपल्या देशांत नीट शिकतां येत नाही, त्यासाठी परदेशच पाहिला पाहिजे, तथापि नित्याच्या व्यवहारांत मी माझ्या देशबांधवांना त्रास देणार नाही ही जाणीव देशांतल्यादेशांत उत्पन्न करता येईल. शहाणी, व्यवहार जाणणारी, देशाचे कल्याण व्हावे असें इच्छिणारी जी माणसे असतील त्यांनी याप्रमाणे आपले वर्तन ठेवले पाहिजे. म्युनिसिपल निवडणुकीसारख्या बाबतीत पैसे घेऊन मते देतात म्हणून कित्येक लोक जनतेला हंसतात. पण त्यांचे हे करणे बरोबर नाही. पेसे देणाऱ्याच्या कृत्याने मत देणारास जसा स्पर्श होतो तसा स्पर्श पैसे न देणारा जर दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने जनतेला करील तर त्याला देखील मतांची उणीव पडणार नाही. सगळे सारखेच बेदरकार, स्पर्श न करील असले काम करणारे असले तर त्यांत पैसे देणाराच बरा. सगळे जर कामांत सारखेच स्वार्थी, आपमतलबी, गचाळ तर मग त्यांतल्या त्यांत दोन पैसे देणारा त्या पैशांपुरता तरी निस्वार्थी, स्वार्थत्यागी, उदार असें जनतेला समजते व त्याला ती पसंत करते. यांत तिचा काय दोष आहे ? जनता ही किती सुधारलेली आहे हे न समजल्यामुळे अशा प्रकारचे प्रवाद उत्पन्न होतात. SISTER मागील भागांत सांगितल्याप्रमाणे संघ स्थापून संघाच्या द्वारे दुसऱ्याचे हित करावयला गेले म्हणजे आपले हित होते ही जाणीव पहिल्याने हिंदी समाजांत उत्पन्न केली पाहिजे. एकमेकांना मदत केल्याने आपले स्वतःचें कल्याण होते ही जाणीव उत्पन्न झाल्यावांचून लोक एकमेकांना मदत करणार नाहीत. लोकांना स्वार्थ समजतो याचे कारण त्याचा त्यांना प्रत्यक्ष स्पर्श होतो. दुसऱ्याचे हित केल्यापासून होणाऱ्या सुखाचा जर असाच स्पर्श होऊ लागला तर तिकडेहि लोकांचे लक्ष लागेल. उत्सवामध्ये दहा माणसे आपल्या जिनसा आणून आरास करतात, आपण मेहनत करून मजा मारतात याचे कारण हेच की, अशा संघानें काम करण्याने जास्त सुख होते हे त्यांना प्रत्यक्ष दिसते; नव्हे अनुभवास येते. इतर बाबींत देखील