पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'भावी हिंदी स्वराज्य ही. [प्र०२ आहे की, राष्ट्र या संज्ञेस पात्र होण्यासाठी त्या समाजाचे जगांतील इतर -समाजापासून निराळे असे विशेष आचार, विचार वगैरे असून त्यांबद्दल त्या राष्ट्रांतील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटला पाहिजे. कोहि गेली तरी ती व्यक्ति आभमानाने मी अमुक राष्ट्राची असे समजत असली पाहिजे व आपले राष्ट्रावे म्हणून ठरलेले विशिष्ट आचार वगैरे पाळण्यास उद्युक्त असावी. या म्हणण्याला अनुसरून हिंदुस्थानची हिंदी म्हणून समजली जाणारी काही तरी आचारविचार परंपरा इतकी लांबरुद पाहिजे की, तिच्यांत हिंदुस्थानांत राहणाऱ्या सर्वांचा समावेश व्हावा व त्या बरोबर हिंदुस्थानाव्यतिरिक्त राष्ट्रांपासून त्यांत विशिष्टपणाहि पाहिजे, लहानपणापासून मुलांना आपले गांव, आपला प्रांत, आपला देश यांचा अभिमान वाटेल अशा त-हेने त्याकडे पाहण्याची दृष्टि किंवा संवय लावली पाहिजे, विशिष्ट प्रकारचे शिक्षण, व्याख्याने, कीर्तने वगैरेंच्या योगाने आपल्या पूर्वजांनी केलेली चांगली व थोरपणाची कृत्ये मुलांच्या कानांवर नेहमी पडली पाहिजेत. अमक्या गोत्रांतील, अमक्या कुलांतील, अमक्या प्रांतांतील व अमक्या देशांतील मी आहे असा अभिमान त्याच्या मनांत उत्पन्न होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. अशा त-हेची वृत्ति लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांत उत्पन्न झाली म्हणजेच त्याला राष्ट्राभिमान म्हणतात. आपल्या देशांतील पुढारी यांच्याबद्दल देखील असाच अभिमान व पूज्यबुद्धि वाटली पाहिजे. पुढाऱ्यांनीहि आपले वर्तन असे ठेवले पाहिजे की, त्यांच्याबद्दल जनतेला अभिमान वाटावा, साधारण माणसे जनता वेडी असे समजतात. पण जनता वेडी नसून ती असावी तितकी शहाणी नसते इतकेच. गप्पा छप्पा मारून जनतेला आपण भुलवू असे कित्येकांना वाटते पण तो त्यांचा भ्रम आहे. तुमच्या बोलण्यापेक्षा तुमची कृति जनतेवर जास्त परिणाम करते. जनता हा प्राणी फार सुधारलेला नाही. त्याला स्पर्शेद्रियाशिवाय इतर इंद्रिये बहुतेक नाहीतच, यासाठी प्रत्यक्ष कर्माचा जेव्हां त्याला आघात व्हावा तेव्हां त्याला त्या गोष्टीचे ज्ञान होते. लांबच्या गोष्टीचे डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून, नाकानें वास घेऊन त्याला ज्ञान होत नाही कारण या प्राण्याला ही इंद्रिये अद्याप आलेली नाहीत. यासाठी प्रत्यक्ष कृति करून