पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण २९ तयार असावी व तिने जितका वाव असेल तेथपर्यंत पूर्ण प्रयत्न करावा व रोज नवीन वाव संपादन करावा. काफी मात्रा देशांतील प्रमुख पुढारी व निरनिराळ्या धंद्यांतील सर्व प्रमुख लोक यांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. साधारणपणे सरकारी व खाजगी संस्था एकमेकांस पूरक असतात. सर्व बाबतीत सरकारला शेंड्यापाशी ठेवण्याचा उद्देश इतकाच असतो की, त्या कामाला त्याची मदत मिळावी; म्हणजे राष्ट्रीय धंदे व सामाजिक सुधारणा यांची अर्जित दशा होण्यास मदत होते. पण हिंदुस्थानांतील पुढारी व सरकार यांची एकवाक्यता नसल्यामुळे दोघांनी सारख्याच आस्थेने मदत केलेल्या संस्था हिदुस्थानांत नाहीत. जर दोघांनााहे मान्य अशी एखादी योजना हिंदुस्थानचा उत्कर्ष करणारी असती तर तिला सर्व लोकांची मदत झाली असती. पण तशी स्थिति नसल्यामुळे पुष्कळ शक्ति कामास येत नाही व कामी लागलेल्या शक्तीतला देखील बराच भाग एकमेकाशी घासाघीस करण्यांत वायां जातो. यापुढे अशी हानि होऊ नये म्हणून राष्ट्रीय योजना तयार करून त्या शेवटास नेण्यासाठी स्पष्ट मार्ग आंखावे. व या मार्गात राजकीय, सामाजिक व औद्योगिक या तिन्ही प्रकारच्या कामांचा समावेश व्हावा. हे राष्ट्रीय कार्य कोणत्या घोरणावर ठरवावें हे पुढील प्रकरणांत खातेवार स्पष्ट करून सांगितले आहे. जर या राष्ट्र कार्याला सरकाराने मदत केली तर लोकांत त्याची चहा होऊन जगांतहि त्याची कीर्ति होईल. पण हल्ली जशा प्रकारचे सरकार हिंदुस्थानांत अधिकारारूढ आहे तसल्या सरकारापासून राष्ट्रकार्याची अपेक्षा धरण्यास आधार नाही. करितां लोकांनीच आपणांस जे करता येईल ते करण्याचे ठरविले पाहिजे, यासाठी योग्य स्वार्थत्याग व संघटना करणे याशिवाय दुसरा मार्ग नाही. इंग्रज सरकाराकडून स्वराज्य बक्षिस म्हणून केव्हांहि मिळणार नाही. कानडा, संयुक्त संस्थाने, ट्रान्सवाल वगैरे देशांचे उदाहरण आपण लक्षात घ्यावे. आयर्लंड, ईजिप्त वगैरे सारखी आपली समदुःखी राष्ट्र व त्यांचे प्रयत्न हेहि आपणांस कित्ता म्हणून उपयोगी पडतील, PATP S o Song हल्लींची राष्ट्रं हे इतके मोठे व भानगडीचे संघ झाले आहेत की. राष्टं कोणाला म्हणावें हे सांगणे कठीण झाले आहे. तथापि एक गोष्ट निश्चित