पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ भावी हिंदी स्वराज्य [प्र०२ कल्याणाच्या दृष्टीने अवश्य आहे. कुटुंबाच्या प्रेमाने जसे गृहसौख्य मिळते त्याप्रमाणे देशाच्या प्रेमानेंहि एक प्रकारचे देशसौख्य म्हणून मिळत असते व एकंदर सुखाच्या राशीत ही दोन सुखेंच घुष्कळ भाग व्यापतात व प्रमुख आहेत." मा किए । न तत्वज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय सभेत बाल्फूर यांनी सांगितले की 'आधुनिक -सुधारणा व सुखें यांचा भोग मिळण्यास राष्ट्रीयत्वाची भावना तीव्र पाहिजे. मानवजातीचे सामुदायिक कल्याण करण्याच्या सर्व मार्गात व प्रजातंत्र राज्यपद्धति पूर्ण विकसित करण्याच्या सर्व पद्धतीत राष्ट्रीयत्वाच्या भावनेला मी अग्रस्थान देतो.", EETT E हिंदुस्थानाने देखील ही राष्ट्रीय भावना दृढ व तीव्र करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत. सबंध हिंदुस्थान म्हणजे एक देश किंवा राष्ट्र या दृष्टीने त्यावर प्रेम करण्यास सर्वांस उत्तेजन दिले पाहिजे. प्राचीन काळापासून आजतागाईत ज्या चांगल्या व थोरपणाच्या गोष्टी हिंदुस्थानांत झाल्या त्याबद्दल अभिमान वाटावा अशी शक्य ती खटपट केली पाहिजे, राष्ट्रीय पुढारी, राष्ट्रीय बांधव यांजबद्दल योग्य आदर व प्रेम प्रत्येकास वाटले पाहिजे. शेजान्यापाजाऱ्यांस मदत करणे म्हणजे देशाचे कल्याण करणे होय हे प्रत्येकाच्या मनावर ठसविले पाहिजे. याप्रमाणे घटना केली म्हणजे व्यक्तींचे व सर्व देशाचे कल्याण होईल. कानडा हे राज्य किंवा संयुक्त संस्थाने याप्रमाणे एकमेकांच्या सहाय्याने थोरपणास चढली आहेत हे उदाहरण हिंदुस्थानाने डोळ्यापुढे ठेवण्यासारखे आहे. 15 BEF ल जगाच्या अनुभवाने में राष्ट्र शहाणे होत नाही ते आपल्या हाताने आपला नाश करून घेतें व ही गोष्ट हिंदुस्थानांत पूर्णपणे प्रत्ययास येते. हिंदुस्थानांत अर्थशास्त्राचे नियम धाब्यावर बसविण्यांत येऊन इतर देशांच्या अनुभवांकडे दुर्लक्ष करण्यांत येते. या देशाचे कल्याण कशाने होईल हे उघड समजण्यासारखे आहे. इतर दहाजणांनी जे आजपर्यंत केलें तें जर हिंदुस्थानाने केले तर त्याचे खात्रीने नुकसान होणार नाही. जेथे जेथे सरकार देशहिताचे काम करील तेथे तेथे लोकांनी सरकारला मनःपूर्वक मदत करावी; पण जेथें सरकार कुचराई करील अगर काम करणार नाही तेथे लोकांनी स्वतंत्रपणे ते काम हाती घ्यावे व यासाठी त्यांची घटना नेहमी