पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रें.] हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण २७ आपल्या स्वतःच्या पोटापुरते देखील अन्न पैदा करति नाही; पण व्यापारधंद्याच्या जोरावर सर्व जगांतील धान्य आपल्याकडे ओढून घेतो व ही पद्धति त्याला सोईची झाली आहे. असे करण्यांत एकप्रकारे धोका आहे ही गोष्ट खरी. महायुद्धासारख्या प्रसंगों बाहेरचे धान्य येणे बंद होईल व उपाशी मगवे लागेल असा धोका या कामी आहे, पण हे लोक हे संकट धीटपणे सोसण्यास कबूल आहेत; कारण हाच मार्ग त्यांच्या मते या परिस्थितीत त्यांस श्रेयस्कर आहे. मी जगाला जपाननहि या बाबतीत इंग्लंडचाच कित्ता गिरविला आहे. पण कानडा व संयुक्त संस्थाने यांचा विस्तार इतका मोठा आहे की, त्यांना अन्नासाठी दुसन्या देशांच्या तोंडाकडे पाहण्याची जरूर नहीं; उलट हे देश इतर देशांतील लोकांनी आपल्या येथे येऊन, शेती करून, अन्न पैदा करावें असे सांगत आहेत. त्यांनी शेती व घंदे हे दोन्ही उद्योग इतक्या उच्च दशेस पाचविले आहेत की, आपल्या देशांतील मालाला परदेशी गि-हाईक मिळावे म्हणून महायुद्ध संपल्यापासून हे देश आगबोटी बांधण्याचे मार्ग आहेत. यापमाणे प्रत्येक देश आपआपल्या सोईप्रमाणे पुढे पुढे पाऊल टाकू पहात असतां हिंदुस्थानाने स्वस्थ कमरेवर. हात देऊन उभे राहणे योग्य होईल का? हिंदुस्थानांतील उत्पन्न व मालाची निपज वाढत नाही. हिंदुस्थानांतील कारभार, व्यापार व घंदे यांची मांडणी अशी आहे की, देशांतील लोकांचे सामर्थ्य व ज्ञान यांना काम करण्यास व वाढण्यास वावच ठेवलेला नाही. निजी TER कोणत्याहि देशातील सर्व लोकांचे सामर्थ्य व ज्ञान यांचा उपयोग करून ज्यास्त हित करून घेण्याचा मार्ग म्हणजे त्या देशाचे राष्ट्रीकरण हा होय. फुटकळ व्यक्ति किंवा संघ यांच्या योगाने देशाचें केव्हांहि कल्याण होत नसते, कानडा वगैरे देशांसारखे आपण सामर्थ्यसंपन्न असावे असें हिंदुस्थानास वाटत असेल तर त्याने आपली जूट व राष्ट्रीकरण केले पाहिजे. माजी अध्यक्ष टॅफ्ट यांनी संयुक्त संस्थानांस खालील उपदेश केला आहे: "विश्वबंधुत्वापेक्षा राष्ट्र व राष्ट्राभिमान यांना मी ज्यास्त मान देतो. ज्याप्रमाणे माणसाला आपल्या कुटुंबाचा अभिमान असणे अवश्य आहे त्याचप्रमाणे त्याला राष्ट्राचा अभिमान व राष्ट्राबद्दल प्रेम वाटणे जगाच्या