पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

als प्रकरण दुसर का हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण ENTED आज हिंदुस्थानांत आपल्यापुढे जे प्रश्न आहेत ते असे आहेतः (१) इतर देशांतील लोकांनी जे अनुभव घेतले त्याचा फायदा घेऊन तुम्ही शहाणे व सशक्त होणार कां दिवसेंदिवस गरीब व अशक्त होणार ? ३ (२) आपण विद्वान् होणार कां असेंच अज्ञान राहणार ? (३) आपण जगांत मिसळून त्यांची बरोबरी करणार का कोंपन्यांत स्वस्थ बसून राहणार ? (४) आपणांस फाटाफूट प्रिय आहे का जूट प्रिय आहे ? (५) आपण नेभळे व भित्रे राहणार का साहसी व शूर होणार ? (६) आपण शेतकीवरच बसणार का उद्योगधंदेहि करणार ? . (७) आपण दरिद्री, तुच्छ व तुडविलेले राहणार कां श्रीमंत, सन्मान्य व दरारा वाढलेले असे होणार ? यापैकी आपण जे ठरवू ते आपणांस प्रयत्नाने होतां येईल; मात्र नुसती मनोराज्ये न करितां आपण प्रयत्न व उद्योग केला पाहिजे, उद्यमेन हि सिध्यंति कार्याणि न मनोरथैः॥ नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंति मुखे मृगाः ॥ सुभाषित. राष्ट्र स्वतःच्या उद्योगानें थोरपणास चढत असतात. कोणतेहि राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रास वर काढू शकणार नाही, पण बुडवू शकेल, असे सांगतात की, राष्ट्रास थोरपणास चढविण्यासाठी कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ व शिक्षक या तिघांनी जुटीने प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे यश हटकून यतें. हिंदुस्थानाने याप्रमाणे केले तर त्यास यश खात्रीने येईल असे वाटते. लाइड जार्ज यांनी नुकतेच असे सांगितले की, इंग्लंडदेश एक पंचमांश शेतीवर व चारपंचमांश व्यापारधंद्यावर अवलंबून आहे. हा देश