पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० २१ १ पहिला धडा शिकावयाचा तो हा की, धंदे, कला, व्यापार यांची • वाढ देशांत होते ती झाडांप्रमाणे आपोआप होत नाही. ती घराप्रमाणे रचनेने करावी लागते व यासाठी माहिती गोळा करणे, योजना तयार करणे व ती आचरून दाखविणे या गोष्टी कराव्या लागतात. कानडा, जपान, इंग्लंड, फार काय पण अमेरिकेतील संयुक्त संस्थानां सारख्या सर्वसंपन्न देशांतसुद्धा सरकारने स्वस्थ बसून या गोष्टी घडून आल्या नाहीत, यासाठी हे काम सरकारला करणे भाग पाडणे व लोकांनी स्वतः शक्य तें करणे या गोष्टी झाल्या पाहिजेत. २ कामाच्या प्रारंभीच नव्हे तर धंदे चांगले ऊर्जित दशेस आले तरी सरकारने आपल्या व्यापारी व उद्योगधंद्याच्या खात्यामार्फत त्यांना सर्व प्रकारे मदत केली पाहिजे, या बाबींत हिंदुस्थानाने जपानची नकल करावी. ३ हिंदुस्थानसरकारने नाही म्हणावयाला आगगाड्यांना थोडी सवलत दिली व पाटबंधाऱ्यांचे काम थोडें बहूत केले, पण धंदे, कारखाने व व्यापार याबाबद हिंदी जनतेला पुढे आणण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. जनतेला या गोष्टींपासून शक्य तितके पारखे ठेवून इंग्रज व परकीय व्यापारी संस्थांना मात्र चरण्यासाठी कुरण मोकळे करून दिल्यासारखें केलें, ४ महायुद्धापासून सर्व जगांत एक प्रकारची क्रांति झाली. असून इंग्लड, अमेरिका वगैरे देशांत जशी पूर्वस्थिति केव्हांहि येणे शक्य नाही त्याचप्रमाणे ती हिंदुस्थानांत देखील शक्य नाही. यासाठी हिंदी लोकांना या कामांत भागीदार करणे अवश्य आहे. ५ हिंदी लोकांना, लोकमताला सरकार दरबारी मान देण्याची, निदान लोकमत स्पष्ट करण्याची सवलत नव्या रिफॉर्म अॅक्टने मिळाली आहे. यासाठी ठराव आणून हिंदुस्थानांत अमुक गोष्टी करण्यांत याव्या अशी सरकारांत शिफारस व लोकांत जागृति उत्पन्न करणे शक्य आहे.