पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.12 जचा उपसंहार ३१७ पढ्यांनी केलेली आहे. कोणत्या कामासाठी कर्ज देणे योग्य हे पाहून या . पेढ्या लोकांना कर्ज देतात, त्या व्यापाऱ्याला माहिती, सल्ला वगैरे देतात, इतकेच नव्हे तर एक बँक दुसऱ्या बँकेला मदत देण्यासाठी शिफारस करते. यामुळे एका खेड्यांतल्या कर्तबगार शेतकऱ्याला परदेशच्या राजधानी पर्यंत ओळखपाळख व सवलती मिळतात. आपली पोष्टाची बँक खाजगी केली तर तिला असला व्यवहार उत्कृष्ट रीतीने करता येईल. जपानी सरकार आपल्या व्यापारावर सूक्ष्म दृष्टी ठेवते व कच्च्या मालाचा पुरवठा व पक्कया मालाचा उठाव याला शक्य ती मदत करते. देशांत साठ सत्तर व्यापारी मंडळे असून चाळीस पन्नास व्यापारी प्रदर्शने आहेत. हाबिन, सिंगापूर वगैरे ठिकाणी तर परदेशी व जपानी वस्तु शेजारी शेजारी मांडतात. लोकांना शिक्षण, उत्तेजन व प्रोत्साहन देण्यांत जपानी अडत्ये पश्चिमात्यांच्या बरोबरीने काम करतात. हे अडत्ये आपला माल खपविण्याच्या व आपल्या देशाला माल पुरविण्याच्या कामी मदत करतात, इतकेच नव्हे तर इतर देशांतून घेण्यासारखी गोष्ट तत्काळ उचलून आपल्या देशांतील लोकांना तिची माहिती देण्यांत तत्पर असतात. त्याचप्रमाणे जपान सरकारचे वकील या कामांत मनोभावाने फार मदत करतात. अशी माहिती जपानांत येतांच ती सर्व वर्तमानपत्रांना पुरवितात व ही आठवड्यांतून दोनदां प्रसिद्ध होते. व्यापारासाठी कोणी जपानी गृहस्थ परदेशी जाईल तर त्यासहि मदत व सवलती मिळतात. सन १९१६ साली तर दहा माणसांचें एक मंडळ सरकारने अमेरिकेत पाठविले. पण अशा प्रकारच्या हिंदुस्थानांतील मंडळांत हिंदी गृहस्थ नसतो. यःकश्चित रस्त्यांची आंतरराष्ट्रीयसभा परिस शहरांत भरली होती तर तिला हिंदी सभासद हिंदी सरकारने पाठविला नव्हता. देशांत पूर्ण धंदेशिक्षण घेतलेले ऐशी विद्यार्थी जपानी सरकार दरसाल परदेशी ज्ञानसंपादनासाठी पाठविते. ही पद्धत वीस वर्षांपासून चालू असून शिकून आलेले सरासरी सहाशे इसम तज्ञ म्हणन तेथे कारखाने चालवीत आहेत.. .' या परदेशाच्या एकंदर निरीक्षणापासून आपणांस काय बोध घेता येईल याचा विचार करून हे प्रकरण संपवू. . .