पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार ६ प्रांतिक सरकारच्या कामांत काही भाग लोकमताच्या ताब्यांत आहे. त्याचा शक्य तो फायदा घेऊन पुढे धैर्याने पाऊल टाकले पाहिजे. इंग्रज किंवा इंग्रजी लोकमताची पर्वा न करतां दिवाणांनी हिंदी लोकांच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. हिंदुस्थान सरकारच्या प्रत्येक अधिका-याने, निदान हिंदी आधिकान्याने याबाबद शक्य ती सुधारणा करण्यासाठी मनोभावें झटलें पाहिजे व लोकानों शिक्षण, माहिती व वळण या तीन गोष्टी संपादन करण्यात व करविण्यांत आपली अक्कल व शक्ति वापरली पाहिजे. असे होईल तरच हिंदुस्थानचे कल्याण होणार आहे. १ समाप्त.