पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०२१ लढाई झाल्याने देशांत फार एकी होऊन व्यापाराला जोर आला. तशांत लढाईचा खर्च, खंडणी वगैरे रकमा मिळाल्याने तर तितकें भांडवल धंद्यासाठी एकदम उपयोगी पडले. याशिवाय जपानसरकारने सामाजिक सुधारणेचे एक कायमचे व सतत चालणारे ध्येय आपल्यापुढे ठेवले आहे. संशोधनाचे काम, संशोघन मंडळे, युनिव्हर्सिट्या, व्यापारी मंडळे, धंदेमंडळे व मजुरांच्या संस्था यांच्या मार्फत सारखें चालू आहे, हे काम दर एक म्युनिसिपालिटीपासून वरच्या प्रत्येक संस्थेवर कायद्याने लादले आहे. सर्वांत मोठी अशी दोन संशोधन मंडळे टोकीओ व ओसाका येथे असून येथे सर्व प्रकारची साधने अनुकूल ठेवली आहेत. याशिवाय खाजगी व्यापाऱ्यांनी संशोधक पदरी ठेवले असून त्या व्यापाऱ्यांना या कामीं सरकारांतून मदत मिळते व बादशहा खुद्द खाजगींतून इनामें अगर बक्षिसे देतात. धंदेशिक्षणांत यंत्रे, रसायन, व्यापार याबाबद सर्वांगपरिपूर्ण शिक्षण देण्याची सोय केली आहे. जपानमध्ये शेकडा वीस ते साठ टक्केपर्यंत संरक्षक जकाती आहेत. व्यापारासाठी कंपन्या स्थापण्याला कायद्याने फार सवलती ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, पोलादाच्या कारखान्यांना जमीन फुकट मिळते व इतर लागणाऱ्या सामानावरील कर माफ ठेवले आहेत. व्यापार, पेढ्या याबाबद देखील अशाच सवलती आहेत. सर्व देशांतील पढ्यांची व्यवस्था पाहून, त्यांतील उत्तम गुणांचा संग्रह करून जपानांतील पेढ्यांची व्यवस्था केली आहे. सगळ्या पेढ्यांच्या शिरस्थानी जपानी पेढी आहे व हिला कागदी चलन काढण्याचा अधिकार आहे. प्रत्येक तालुक्याला तालुक्याची पेढी आहे व ही तालुक्याच्या सरकारप्रमाणे पेढीचे काम करते. धंद्यांच्या उत्तेजनार्थ धंद्यांची एक मध्यवर्ति पेढी आहे व हिला आपल्या भांडवलाच्या दसपट किंमतीपर्यंत कागदी चलन काढतां येते. ही धंद्यासाठी भांडवल पुरविते. शेती सुधारण्यासाठी शेती पेढी आहे. परदेशी व्यापारासाठी याकोहोमा स्पेसी बँक आहे. ही परदेशात सर्वत्र शाखा स्थापून तेथे जपानी लोकांना मदत करते. याप्रमाणे प्रत्येक खेड्यापाड्यापासून तो थेट परदेशापर्यंत सर्व व्यवहारांची सोय