पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] उपसंहार नवीन गलबते बांधण्याकडे त्या देशांत विशेष लक्ष देण्यात येत आहे. जगांत जहाजे बांधण्याची सर्वांत मोठी गोदी हाग बेटावर आहे. तीत पन्नास आगबोटी एकदम बांधतां येतात. याखेरीज अमेरिकेचा सगळा किनारा गलबते बांधण्याच्या गोद्यांनी व्यापून टाकला आहे. गलबते बांधण्याचे काम एका बोर्डाकडे असून हा सरकारी बोर्ड गलबतें बांधून लोकांस विकतो, स्वस्त माल मिळण्यास चढाओढ पाहिजे ही गोष्ट अमेरिकेला मान्य आहे. परदेशी व्यापार वाढविण्यासाठी लोक व सरकार सारखेच झटत आहेत. आयात व निर्गत व्यापाराचा अभ्यास केलेल्या विद्वानांना अमेरिकन सरकार मुद्दाम इतर देशांत पाठवितें व यांजकडून आलेली माहिती सर्वांस मिळेल अशी प्रसिद्ध करण्यांत येते. अमेरिकेतील मालाचा इतर देशांत फैलाव होण्यासाठी अमेरिकेनें खालील युक्तया वापरण्याचे ठरविले आहे. (१) अमेरिकन मालाची फिरतों चित्रे, (२) यंत्रे व माल यांचे नमुने प्रदर्शनासारखे मांडणे, व (३) परदेशी व्यापारांत वापरण्यांत येणारे कागदपत्रांचे नमुने प्रसिद्ध करणे. संपन्न व पूर्णतेस पोंचलेल्या अमेरिकन सरकारास जर इतक्या खटपटी कराव्याशा वाटतात तर हिंदुस्थानांत असल्या खटपटींची किती जरूर आहे बरें ? पण हिंदुस्थानाला अमेरिकेचा कित्ता घेणे त्यांच्या सांपत्तिक स्थितीतील भेदामुळे अशक्य आहे. पण जपानाची तशी स्थिति नाही. जपानाने योड्याच वर्षात धंद्यात सुधारणा घडवून आणल्या व त्याचा कित्ता हिंदुस्थानास गिरविता येईल. जपानांत धंदे व सरकार यांचा निकट संबंध आहे. जपानचे प्रमुख धंदे सर्व सरकारने सुरू करून पुष्कळ दिवस चालविले होते. अदमासे तीस चाळीस वर्षापूर्वी सर्व गलबतें बांधण्याचे कारखाने सरकारी होते. सन १९०० च्या सुमारे सरकार दर एक टन बोजा नेणाऱ्या गलबतास ११ ते २२ येन बक्षीस देत असे व नुकती दहावीस वर्षे झाली, सरकारने सर्व गलबतें बांधण्याचे काम खाजगी लोकां. कडे दिले आहे. मात्र दरसाल या खाजगी मंडळांना सरकारांतून इनामें मिळतात. याशिवाय धंदे वर काढण्याचा दुसरा मार्ग नाही. जपानला यः अनुभव आला की, त्याची पहिल्याने चीन व मागून रशियाशी