पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१४ भावी हिंदी खराज्य [प्र० २१ घुष्कळ असून तेथे धंदे पूर्णावस्थेस पोचले आहेत तरी ही भिंत काढण्याची गोष्ट कोणी बोलत नाही. अनेकविध यंत्रे, नानाविध कार्यकारी शक्ति व थोड्या खचीत उत्तम देखरेख या गोष्टी अमेरिकेतील धंद्याचे एक सगळीकडे दिसणारे लक्षण आहे. व म्हणूनच प्रचंड संघ व अवाढव्य कारखाने तेथे आहेत. फोर्डमोटार कंपनीचा दरसालचा व्यवहार पस्तीस चाळीस कोट डालरचा आहे. यांत छत्तीस हजार लोक नेहमी कामावर असतात व दर एकूणतीस सेकंदाला म्हणजे अर्ध्या मिनिटाला जरा कमी इतक्या वेळांत एक मोटार तयार होते व आठ तासांच्या एका दिवसांत एकदा त्यांनी तीन हजार मोटारी तयार करून दिल्या. खाजगी इसमांची संपत्ति तर कल्पनातीत आहे. जगप्रसिद्ध जान राकफेलर यांची मिळकत तीस अब्ज डालरची असून त्याचे उत्पन्न दरसाल दहा कोटी डालर आहे. अमेरिकेंत आठ दहा हजार पेढ्या आहेत व त्या सर्वांची एक मध्यवर्ती जूट आहे. वाशिंग्टन येथील पेढ्यांच्या मंडळाकडे बारा संघांचे काम आहे व या सगळ्या पेढ्यांत अशीच स्थिति आहे. या मंडळाने परदेशी पेढ्यांची दुकाने काढण्याचे ठरविले असून मध्य व दक्षिण अमेरिकेतील संस्थानांतून सोन्याचे नाणे सुरू करण्यास मदत करण्याचे ठरविले आहे. याचप्रमाणे सगळ्या देशभर जागोजाग व्यापारी मंडळे किंवा चेंबर ऑफ कामर्स स्थापन झाल्या आहेत. या चेंबर्स ऑफ कामर्सचे मध्यवर्ती मंडळ म्हणजे अमेरिकेतील सर्व प्रमुख व्यापाराचे प्रतिनिधि होय, याची कचेरी वाशिंग्टन येथे आहे व मोठे कारखानदार व व्यापारी, याचे सभासद आहेत. या मंडळाने आपल्या पदरी, तज्ञ, कारभारी, शोध करणारे, वर्तमानपत्रकार व स्वयंसेवकपथक इतकी मंडळी बाळगली आहेत. अमेरिकेचा पुढचा सुधारणेचा बेत पुढीलप्रमाणे आहे-शेती व धंदे यांच्या उत्पन्नांची वाढ करणे, परदेशी व्यापार वाढविणे व अमेरिकेची गलबतें वाढविणे. आपला व्यापार परदेशांत वाढावा असे वाटत असल तर गलबतें बांधणे व बंदरें सुघारणे या गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत ही गोष्ट अमेरिकनांना पटली आहे. आपली गलबतें पुरेशी नव्हती म्हणून सापला परदेशाशी व्यापार वाढला नाही ही गोष्ट त्यांनी ओळखली असून