पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या उपसंहार का तसेच शेतीवर अवलंबून ठेवावे हे योग्य होईल काय ? आजची कानडाची स्थिति पाहिली तर त्याचे शेतीचे उत्पन्न कमी असून धंद्याचे जास्त आहे असे दिसेल, शेतीपासून १६२ कोट डालर, माशांचे उत्पन्न चार कोट डालर, जंगलचे उत्पन्न सतरा कोट डालर, खाणीं में उत्पन्न एकोणीस कोट डालर व कारखान्यांचे उत्पन्न २४० कोट डालर असें कानडाचे उत्पन्न सन १९१७ साली होते व त्यांत गेल्या पांचसात वर्षात सुधारणा झालीच असेल. ही सुधारणा होण्यासाठी कानडाने आयात व निर्गत मालावर सरासरी सरसकट पंचवीस टक्के जकात ठेवली आहे. कारखान्यांच्या वाढीबरोबर पेढ्यांचा व्यवहार देखील वाढत आहे. आतां कानडा सरकारने आपला व्यापार परदेशांत वाढविण्याकडे लक्ष लावले आहे व यासाठी व्यापार व धंदे आणि पैसा व पेढ्या अशी दोन खाती झटून काम करीत आहेत, व्यापारोपयोगी माहिती गोळा करण्याचे एक खातेच काढले असून धंद्यांना उत्तेजन देण्यासाठी मोठी खटपट चालली आहे. सरकारच्या या खात्यांतून लोकांत माहिती पसरावी म्हणून नेहमी पत्रके व पुस्तके प्रसिद्ध करण्यांत येतात. आठवड्याकाठी एक पत्रक तर सर्वत्र फुकट वांटण्यांत येते. खरोखर म्हटले तर कानडा सरकार म्हणजे एक या कामी गिरविण्यालायक कित्ता आहे, धंदेशिक्षण देणे, धंद्यांस मदत करणे व धंद्यांबद्दलची माहिती प्रसिद्ध करणे या गोष्टी धंद्यांच्या वाढीला अवश्य आहेत हे अगदी उघड आहे. कानडाचे मध्यवर्ती सरकार फक्त माहिती गोळा करते व प्रसिद्ध करते. त्याप्रमाणे प्रत्यक्ष धंदे काढण्याचे काम प्रांतिक सरकारांकडे आहे. एका प्रांताने धंदे वाढविण्यासाठी एका सालांत वीस लक्ष डालर मदत केली व ही मदत जो कोणी कारखान्यासाठी जितकी रक्कम जमवील तितकीच सरकार देते अशी आहे. पूर्व कानडांत तर लहान धंद्यांना म्युनिसिपालट्या अशी मदत देतात. हिंदुस्थानांतील पद्धत कानडाच्या अगदी विरुद्ध आहे. हिंदुस्थानांत कोणतेच सरकार कारखान्यांना मदत करीत नाही व अशी मदत देऊ नये असे विलायतेपासून सरकारचे धोरण दिसते. - अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत कारखानदारांना मदत देण्याची जरूर पडत नाही तरी जकातीची भिंत मजबूत घातलेली आहे. अमेरिकेत पैसा