पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार मार्गाने आज जाण्यास सुरुवात व्हावी अशी सुरुवात करता यावी यासाठी ग्रंथारंभी काही माहिती दिली आहे, ग्रंथांत कांही दिली आहे व शेवटी हि माहिती दिली असून त्यावरून निर्णय ठरविले आहेत, ते पुढीलप्रमाणे:___ इंग्लंडसारख्या स्वतंत्र देशांत सुद्धां उद्योगधंद्यांच्या सुधारणांसाठी खाली लिहिल्याप्रमाणे चार गोष्टी करण्यांत येत आहेत. १ नवीन शोध लागावे व कारखान्यांची वाढ व्हावी म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. याबाबदचें ढळढळीत उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये शेतीसुधारणा व रंग तयार करणे या कामी होत असलेले प्रयत्न होत. याबाबद इंग्लंडपेक्षां जर्मनी व संयुक्त संस्थाने यांनी धंद्याच्या बाबतीत नवीन शोध लावण्याबद्दल जास्तच लक्ष दिले आहे. संयुक्त संस्थानांनी दहा लाख गैंड म्हणजे दीड कोट रुपये नवे धंदे व शास्त्रीय शोध यांसाठी दरसाल खर्च करण्याचे ठरविले आहे. २ घरे बांधणे यासारख्या केवळ स्थानिक कामासाठी देखील मध्यवर्ती सरकाराकडून स्थानिक संस्था व खाजगी व्यक्ति यांना मदत देण्याचे ठरले आहे. लढाईपूर्वीच लोकांना हे स्पष्ट दिसू लागले होते की, गरीब लोकांना विशेषतः शेतकींत कामें करणाऱ्या मजुरांन नवीन धर्तीवर अधिक आरोग्यकारक घरे बांधून दिली पाहिजत व ही गोष्ट एक राष्ट्रीय धोरण म्हणून सर्व देशभर अमलांत आली पाहिजे. लढाई संपल्यानंतर तर या बाबींत सर्व मतभेद नाहींस होऊन सरकार या कामीं मनःपूर्वक खटपट करीत आहे. ३ हल्लीचे प्रधानमंडळ जरी त्या गोष्टीला कबूल नाही तरी दिवसेंदिवस खाणी व आगगाड्या सरकारच्या मालकीच्या करण्याकडे लोकमत झुकत चालले आहे, कापड, चामडे, तेल, कोळसा, लोखंड व गलबतें या कारखान्यांनी ज्या प्रचंड जुटी केल्या आहेत त्यांचे वजन व बंड हे कारखाने सरकारच्या मालकीचे व सार्वजनिक केल्याशिवाय मोडणार नाही. याबाबद आतां सर्वांची खातरी झाली