पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१० आवी हिंदी स्वराज्य [प्र० २१ कामाचे स्वरूप आपणांस नीट समजते. शरीराच्या ठिकाणी जीव किंवा बुद्धि, मन, ज्ञानोंद्रिये, कर्मेंद्रिये व स्पर्श अशी पांच तत्सदृश केंद्रे आहेत. या केंद्रांनी करावयाची कामें परस्परांशी अगदी सदृश आहेत यासाठी त्यांची जास्त फोड करीत नाही. कोणाहि विचारी माणसाला त्यांचे सादृश्य दिसून येईल. ग्रामसंस्थांत न्यायाने वागणारी माणसे पाहिजेत, स्थानिक संस्थांत दया करणारी माणसे पाहिजेत, प्रांतिक सरकारांत शक्तिमान् माणसे पाहिजेत, मध्यवर्ती सरकारांत ज्ञानवार माणसे पाहिजेत व राजाजवळ अद्वितीय ऐश्वर्यसंपन्न माणसे पाहिजेत. यासाठी आपण प्रत्येक निवडणुकीत या योग्यतेची माणसें नीट काळजीपूर्वक निवडावी व त्यांना आपल्याला योग्य व शक्य दिसेल ते करूं द्यावें.. निवडलेली माणसें नियमित मुदतीं पुरतीच असतात व त्यांना निवडण्यांत चूक झाली असें दिसल्यास झालेली चूक पुढील निवडणुकीत दुरुस्त करावी. या निवडलेल्या माणसांना कामे करण्यास काही तरी मार्गदर्शक असावें. जसा दिवा हा तात्पुरता मार्ग दाखवितो व तो आपल्याबरोबर चालत असल्याने क्षणोक्षणी पुढचा थोडा मार्ग दाखवून आपणांस रस्त्याच्या टोकापर्यंत जाण्यास मदत करतो त्याप्रमाणे नाना देशांतील माहिती गोळा करून तिच्या उजेडांत तात्पुरत्या सुधारणांचा निर्णय करावा व त्याप्रमाणे अंमल करावा. हे माहिती गोळा करण्याचे व निर्णय ठरविण्याचे काम अखंड चालू पाहिजे व त्याच्या प्रकाशांत दर क्षणी नव्या माहितीचा उपयोग करून पुढे पाऊल पडत असावे अशी योजना पाहिजे. नाना खात्यांची माहिती गोळा करून त्यापासून निष्कर्ष काढणारे संघ पहिल्या स्थापन झाले पाहिजेत, या संघांत कामे करण्यास आज अगदी थोडी म्हणजे दोन चार, कदाचित् एकच, मनुष्य मिळेल, पण त्या एकट्यानेच मिळालेली माहिती जनतेपुढे मांडून तिच्यापासून निर्णय ठरवून व त्याप्रमाणे स्वतः एकट्यानेच आचरण करण्यास सुरुवात केली पाहिजे. कालांतराने या कामाकडे लोकांचे लक्ष लागेल, अनेक कामे करण्यास माणसे मिळतील व काम होईल. प्रत्येक कामाची दिशा म्हणजे अनेक ठिकाणची माहिती गोळा करणे, तिचा विचार करून निर्णय ठरविणे व त्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करणे ही ठरलेली आहे. या