पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०२० खर्च केवळ त्याच कामाकडे हिंदी लोकांच्या हातून हिंदी लोकांच्या कल्याणाकडे व्हावा, खर्चाची अशी हमी व फायद्याचा असा अनुभव आल्यावर लोक मोठ्या खुषीने पैसे देतील व आपले दैन्य घालविण्यास मदत करतील, को स. या कर्जाबरोबरच हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे सुरू करून हिंदुस्थान सरकारची मान विलायती व्यापाऱ्यांच्या हातून सोडविली पाहिजे. त्याचप्रमाणे स्टेट सेक्रेटरीचा हिंदी खजिन्यावर ताबा नसावा. विलायतेतील लोकांचे देणे लंडन शहरांत एक हिंदी पेढीची शाखा काढून तिच्या मार्फत देण्यात यावे व आपले उत्पन्न कसे व कोणत्या उपायाने वाढवावें याबाबद हिंदुस्थानाला स्वातंत्र्य पाहिजे. दुसऱ्या गोष्टी सोडल्या तरी हिंदुस्थानांतील लोकांचा असा ग्रह झाला आहे की, विलायती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हिंदुस्थानची गळचेपी करण्यांत येते. हा ग्रह नाहीसा व्हावा इतक्यासाठी तरी वर लिहिलेल्या सुधारणा झाल्या पाहिजेत. यासाठी एक कमीशन नेमावे. त्यांत दोनतृतीयांश हिंदी लोक असून एकतृतीयांशांत अधिकारी व अनधिकारी तज्ञ असावे. या कमीशनने कानडा, आस्ट्रेलिया वगैरे देशांतून माहिती मिळवून इंग्लंड व हिंदुस्थान यांचा संबंध निश्चित ठरवावा. असे केल्याशिवाय वरील चमत्कार बंद होणार नाहीत. हिंदी नाणे, पेढ्या वगैरेंचा प्रश्न हिंदुस्थानसरकारने हिंदी प्रतिनिधींच्या सल्ल्याने सोडवावा. यासाठी एक कमीशन, एक लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची कमेटी व सर्व प्रांतिक कौन्सिलांच्या निरनिराळ्या कमेट्या नेमून त्यांच्याकडून ताबडतोब निर्णय व त्याप्रमाणे बजावणीची व्यवस्था झाली पाहिजे. अधिकारी व तज्ञ यांना या कमेटींत नेमावें. पण त्यांनी निर्णयांत मत देऊ नये. यापुढे पैशाचे सर्व व्यवहार राजरोस, लोकांच्या सल्ल्याने होऊन त्यांची वेळोवेळी प्रसिद्धी करण्यांत आली पाहिजे. सरकारच्या कामांत, सार्वजनिक कामांत गुप्तपणा बिलकुल उपयोगी नाही..