पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] आर्थिक स्वातंत्र्य अशक्य आहे. शिवाय या कामाचा सर्व बोजा एकाच पिढीने उचलावा होह योग्य नाही. याप्रीत्यर्थ हिंदुस्थानसरकारने दरसाल पंधरा वीस कोट रुपये धंदेशिक्षणाकडे व पांचपन्नास कोट रुपये कारखाने काढण्याकडे, निदान दहा पंधरा वर्षे, खर्च केले पाहिजेत व यासाठी लागणारी रक्कम कर्ज काढली पाहिजे, इतर देशांनी महायुद्धासाठी मोठमोठे कर्जाचे बोजे डोक्यावर घेतले आहेत व हिंदुस्थानाने देशाच्या उन्नतीसाठी तसा बोजा घेणे गैरवाजवी नाही इतकेच नव्हे तर अवश्य आहे. शिक्षणासाठी कर्ज काढणे विलक्षण आहे खरे. पण हिंदुस्थानांत वर सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी विलक्षण असल्याने हे एक विलक्षण कृत्य करावे लागत आहे. जपानसरकारने इतकी धंदे वगैरेत प्रगति केली आहे तरी नुकतेच शिक्षणासाठी कर्ज काढलेच आहे. या कामीं जपानी पार्लमेंटनें शिक्षण म्हणजे काही धंदा किंवा उत्पन्नाची बाब नाही सबब यासाठी कर्ज काढूं नये असे म्हटले, पण शिक्षणासाठी खर्च झालेली रक्कम पुढे सव्याज फिटेल असें अश्वासन देऊन जपानी सरकारने हे कर्ज काढलेंच, हिंदुस्थानांत कारखाने वगैरेंची वाढ मुळींच झालेली नाही, अशा स्थितीत हे कर्ज काढणे किती अवश्य आहे हे कोणासहि सांगावयास नको. हिंदुस्थानसरकारला हल्ली कर्ज आहेच व त्यांत महायुद्धासाठी म्हणून भर पडून त्याची स्थिति खाली दिल्याप्रमाणे आहे. पाटबंधाऱ्यांसाठी काढलेले कर्ज ६६ कोटी आगगाड्यांसाठी काढलेले कर्ज ३५९ कोटी महायुद्धासाठी काढलेले कर्ज १३३ कोटी एकूण ५५८ कोटी. ___याच कर्जात धंदेशिक्षण व कारखाने यासाठी आणखी पांचशे कोटीच्या कर्जाची भर घातली तर काही मोठी हानी होणार नाही. देशाचे सालिना उत्पन्न सव्वाशे कोटींचे आहे व त्याला हजार कोटींचे कर्ज मोठे भारी नाही. शिवाय दहा वर्षांनंतर शिक्षण व कारखाने यापासून लोकांची संपन्नता वाढली म्हणजे तर हे कर्ज म्हणजे काहीच बाब नाही असे वाटेल. प्रत्येक प्रांताने आपल्या कामासाठी त्या प्रांतांतच कर्ज काढावे व त्या कर्जाचा