पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य पगारी ठेवावे व त्यांस मोठ्या लोकांनी पगार द्यावा. आपण आपला व्यवसाय करून जो पैसा मिळवितो त्याचा अंश याप्रमाणे काम करणाऱ्या माणसास दिला म्हणजे आपण अंशतः काम केल्यासारखेच आहे. स्वतःची सर दुसऱ्याला येणार नाही हे खरे. पण कामाकडे खर्च करण्यास वेळ नसतांना काम केल्याची बतावणी करण्यापेक्षा हे ब्राह्मणद्वारा केलेले काम बरें. सगळा दिवस तो एक माणूस त्या कामांत खपत राहिल्याने त्याला दरमहा काही तरी काम दाखवितां येते. शहरांत बारा प्रमुख वकील व डाक्तर वगैरे असले तर त्यांपैकी एक एकाने एक एक महिन्याचा पगार दिला तर संस्थेचे काम सारखें बारा महिने ब्राह्मणद्वारा होईल व एक काम करणारा नोकर कामांत वाकब व तयार झाला हा सुद्धा काही लहान , सहान फायदा नाही. SEPSIFFER अशा रीतीने देशाच्या कामांत सर्वस्वी गुंतलेली काही तरी स्वतंत्र व . खाजगी माणसें निर्माण होतील. देशाच्या कल्याणाचा विचार सारखा त्या भागांत चालू राहील. सार्वजनिक सर्व बाबींवर नजर राहील व त्यांचा .. अभ्यास चालेल. जनतेपुढे वारंवार त्याच त्याच गोष्टी आल्याने या गोष्टींबद्दल जनतेत जिज्ञासा उत्पन्न होईल. पहिल्याने सहज करमणुकीखातर, मग कौतुक म्हणून येतां येतां जनतेवर परिणाम होऊन तीत त्या बाबींत जागृति उत्पन्न होईल. जागृति झाली म्हणजे तिकडे तिचे लक्ष जाऊन त्या कार्यासाठी लागणारी शक्ति तिच्या ठिकाणी निर्माण होईल. याप्रमाणे पायरीपायरीने कामांत यश येईल. नुसते स्वस्थ पडून राहण्याचा हा काळ नाही. ज्याला त्याला काही तरी करावे असे वाटू लागले पाहिजे. ज्याला जे करता येणे शक्य तेंच त्याने करावे. प्रत्येक घरांत, प्रत्येक दुकानांत, प्रत्येक कारखान्यांत, प्रत्येक कचेरीत आपल्याला जास्त चांगले काम कसें करता येईल ३ असे होण्यासाठी काय करावे असा विचार करण्याची संवय पहिल्याने उत्पन्न झाली पाहिजे. एकांतांत आत्मनिरीक्षण म्हणून सर्व शास्त्रकारांनी व संतांनी ज्याची स्तुति केली आहे ते म्हणजे हा विचार करणेच होय. 15 EPI Siram किमिदं, कथमिदं जातं, को वा कतास्य विद्यते ॥ का उपादानं किमस्तीति विचारः सोयमीदृशः ॥ . ...