पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-संघस्थापना वागणुकीस सुरुवात करावी. मग कालांतराने असल्या संघांचे एकीकरण (निदान मेळ) घालतां येईल. पहिल्याने विचार करण्यास व माहिती मिळविण्यास सुरुवात होऊन ते विचार कागदावर पडले पाहिजेत म्हणजे ते जमीनीत पडलेल्या बियांप्रमाणे योग्य परिस्थिति येतांच उगवतील, पृथ्वीवर उगवलेल्या गवताचे उदाहरण आपण गिरविण्यालायक आहे. गवत उगवते, त्याला बी येते, मग ते मरते. त्याचा उपयोग कोणी करो, न करो, इतकेच नव्हे तर उपयोग काय असाहि ते विचार करीत नाही. मात्र त्याला बी येऊन तें मेले पाहिजे. हल्लों आपल्या देशांत संघ-संस्थांची -बी-बूड झाली आहे. ती स्थिति मोडली पाहिजे. वाटेल ते का काम होईना, एकमेकांच्या नाशासाठी, एकमेकांच्या विरुद्ध काम करणारे जरी संघ झाले तरी हरकत नाही. पण ते विचारपूर्वक व शिस्तीने काम करूं लागले पाहिजेत. अगदी एकमेकांविरुद्ध काम करणाऱ्या संघांचेंहि कालांतराने तडजोडीने, ज्ञान वाढल्यामुळे संयोगीकरण करता येईल. नियमितपणे व संघाने कामें करण्याची पहिल्याने संवय लागली पाहिजे. विचार करण्याची संवय लागली पाहिजे, मग या संवयीपासून वाटेल ते काम करून घेता येईल, . स्वार्थ यागपूर्वक फुकट काम करणारी फार माणसें केव्हांहि मिळणे शक्य नाही हे जाणूनच चार किंवा दोन माणसें कामाला पुरेत असे वर म्हटले आहे. यापेक्षा जास्त माणसे मिळण्यासारखी असतील तेथे दोन दोन माणसांनी एक एक साल याप्रमाणे आळीपाळीने काम करावें. विचार मात्र प्रत्येकानें व सगळ्यांनी करावा, माहिती गोळा करणे ती ज्याची त्याने प्रत्येकाने मिळवावी व ती कामें करणाऱ्या माणसांकडे द्यावी. अशी जी माहिती गोळा होईल तिचा काम करणाऱ्यांनी योग्य विचार करून ती नीट व्यवस्थित लावावी. पुढारी असे निवडावे कों, त्यांवर सर्व प्रकारच्या माणसांचा विश्वास असावा. त्यांनी कोणत्याहि एका पक्षाकडे ओढा ठेवू नये. आलेल्या माहितीचा योग्य विचार करून निर्णय ठरविणे व त्याप्रमाणे वागण्यास सुरवात करणे व करविणे ही पुढान्यांची मुख्य कामें आहेत. केवढाहि मोठा पुढारी असला तरी त्याला आपला वेळ सर्वस्वी एक वर्षभर तरी त्या कामाकडे लावतां येत नसेल तोवर त्याने काम करणारा इसम होऊ नये. जरूर तर काम करणारे इसम