पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आर्थिक स्वातंत्र्य (इमारती), गहूं, चामडी व दुसऱ्या उपयुक्त जिनसांच्या मोकळ्या व्यापाराला बंदी करून त्या स्वस्त दराने दोस्तांना मिळतील असे केले होते. हिंदुस्थानाने इंग्लंडला जे कर्ज दिले त्यावर योग्य व्याज त्याला मिळाले नाही आणि हिंदुस्थानाने लंडनमध्ये ठेवलेली मोठी ठेव त्या वेळी गडप झाली. चांदी हिंदुस्थानांत बाजारभावाने खरेदी न करतां इंग्रज व्यापाऱ्यांकडून मक्त्याने खरेदी करण्यांत आली. कानडासारखा स्वतंत्र देश इंग्लंडला सर्वतोपरी मदत करून सुद्धां वर लिहिलेल्या उलाढालींत पुष्कळ गबर झाला. याप्रमाणे कानडाने प्रत्यक्ष स्वहित साधले. जपान व संयुक्त संस्थाने देखील या लढाईत चांगली गबर झाली. संयुक्त संस्थाने तर आज जगांत सर्वसंपन्न देश होऊन बसला आहे व सर्व जगाची सावकारी आज त्याच्या एकट्याच्या हाती आहे, आजपर्यंत प्रतिस्पर्धेमुळे किंवा चढाओढीमुळे मिळाले नव्हते असे मोकळे रान महायुद्धांत जपानास मिळाले. हिंदुस्थानचा कारभार हिंदी लोकांच्या हाती असता, अगर हिंदुस्थानच्या हिताकडे पाहून चालविण्यांत येता तर महायुद्धाच्या पांच वर्षांतील नफ्याने त्यापूर्वीच्या पन्नास वर्षांचे नुकसान भरून निघाले असते.. हिंदुस्थान हा एक परतंत्र देश असून जगांतील राष्ट्रांशी त्याचा लढाई वगैरेंत मुख्य संबंध कोठेच येत नाही. असे असून लष्कराकडे होणारा अवाढव्य खर्च कशासाठी करण्यांत येतो याचे समर्पक उत्तर कोणालाच देता येत नाही. महायुद्धांत तर हिंदुस्थानचा कांहींच हितसंबंध नव्हता तरी त्यास वर वर्णन केल्याप्रमाणे नागविण्यांत आले व त्याच्या भरपाईचा प्रश्न लढाई संपल्यावर कोणी काढला सुद्धा नाही. सन १९२०-२१ सालीं चौसष्ट कोट रुपये लष्कराकडे खर्च आहे. ही रक्कम सबंध उत्पन्नाच्या निम्मे आहे. उत्पन्नापैकी निम्मा खर्च संरक्षणाकडे ही एक अश्रुतपूर्व गोष्ट आहे व तीहि शांततेच्या काळी ! कोणीहि इसम आपले निम्में उत्पन्न केवळ राखणदार भय्याला द्यावयास कबूल व्हावयाचा नाही, पण हिंदुस्थानसरकार तसे प्रत्यक्ष करीत आहे, विलायतसरकार आपल्या लष्करावर किंवा जपानसरकार आपल्या लष्करावर उत्पन्नाचा एक