पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०० भावी हिंदी स्वराज्य [प्र० २० उलाढालीने गोंधळ करते त्या त्या वेळी ते असल्या व्यापाऱ्यांच्या फायद्यांत भर घालून घेण्यास जागा करून देत असते." स्वतंत्र राज्यांत असा अनुभव येतो असें लार्ड ब्राईस यांचे म्हणणे आहे तर परतंत्र राज्यांत असल्या उलाढालींनी काय होत असेल याची कल्पनाच करावी. विमा, ठेवी, हुंडणावळ, जकात व देवघेव या बाबींत हिंदुस्थानसरकार नेहमी खाजगी व्यापारांत ढवळाढवळ करते. रेलवे, पोष्ट, तार, पाटबंधारे, पाणीपुरवठा हे सर्व व्यापार हिंदुस्थानांत सरकारी आहेत. ५ प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, हिंदुस्थानसरकारची सांपत्तिक उलाढाल हिंदुस्थानाला फार घातक अशी आहे. हिंदुस्थानांत मोकळे सोन्याचे नाणे सुरू केले तर हिंदुस्थानची पत पुष्कळ वाढेल व त्यामुळे व्यापार व धंदे या कामी हिंदुस्थानला पुष्कळ फायदा होईल, हल्लींची यूरोप व अमेरिका यांमधील सांपत्तिक स्थिति तर हिंदुस्थानांत सोन्याचे नाणेच व्हावे असे म्हणण्याजोगी आहे. साधारण दिवसांत हिंदुस्थानांतून परदेशी जाणारा मालच नेहमी जास्त असतो व यामुळे हिंदुस्थानाला बाहेरदेशी सोने पाठविण्याचा प्रसंग सहसा येणार नाही. ६ महायुद्धाच्या काळांत हिंदुस्थान परतंत्र असल्याने त्याच्या पैशा संबंधी सर्व बाबी लंडनच्या हाती होत्या. महागाईमुळे लोकांचे फार हाल झाले, युद्धामुळे होणारा नफा हिंदुस्थानांत फार थोड्यांच्या वांट्यास आला. पुष्कळ जिनसा हिंदुस्थानांतून जगांत येणाऱ्या किंमतीपेक्षां पुष्कळ कमी किंमतीस नेल्या. अन्नावर तर गुप्त रीतीने हात मारण्यांत येऊन किती अन्न देशा बाहेर गेले याचा हिंदी लोकांस वास सुद्धां येऊ दिला नाही. हिंदुस्थानांत याप्रमाण चांगल्या अन्नाचा तुटवडा पडून इन्फ्लुएंझा (पडसें ताप) आला तेव्हां लाखों लोक मृत्युमुखी पडले. चामडी वगैरे जिनस। मन मानेल त्या भावाने दोस्तांना मिळाव्या म्हणून त्यांचा व्यापार प्रतिबंधांत ठेवला होता. त्याचप्रमाणे तांदूळ, ताग, लांकूड