पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आर्थिक स्वातंत्र्य हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत पुष्कळ विसंगत बाबी आहेत त्या अशा:१ हिंदुस्थानचा सर्व कारभार रुपयांत चालतो; तरी देशाचे अंदाज पत्रक रुपयांतच न करतां तें गैंडांत करण्यांत येते व त्यापैकी मोठी म्हणजे सरासरी पन्नास साठ कोटींची रक्कम लष्कर, पेनशन व मालखरेदी या कामी खर्ची पडते. कानडा वगैरे साम्राज्यांतर्गत दुसरे देश असल्या कामांसाठी पैसे द्यावयाचे ते बँकांच्या मार्फत देतात व त्यांना लागणाऱ्या जिनसा ते स्वदेशी दुकानदारांच्या मार्फत खरेदी करतात. यामुळे हुंडणावळ वगैरे बरेच पैसे त्यांच्या स्वतःच्या देशांतच उरतात. हिंदुस्थानांतील अंतर्गत व्यवहार चांदीत होतो. काही वर्षांपूर्वी बसलेल्या कमेटीने हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे सुरू करावे अशी शिफारस केली. इतर सुधारलेल्या देशांतून सोन्याचे नाणेच व्यवहारांत आहे, विलायतेतील सावरीन हिंदुस्थानांत चालतो पण हिंदुस्थानचा रुपया इंग्लंडांत चालत नाहीं; इतकेच नव्हे तर रुपयाचे सावरीन हिंहुस्थानांत वाटेल तेव्हां मिळतील असा नियम नाही. .३ हिंदुस्थानचा व्यापार स्वतत्रपणे चालणे इष्ट आहे. नाही पण कौन्सिल बिलें, टेलिग्राफ ट्रान्सफर व रिव्हर्स ड्राफ्ट यांनी त्यांत ढवळाढवळ केली जाते. सोन्याची ठेव व कागदी गंगाजळी हिंदुस्थानांत न ठेवता ती लंडनमध्ये ठेवण्यांत येते. यामुळे या ठेवीचा फायदा हिंदुस्थानचा व्यापार व हिंदुस्थानची पत यांना होत नाही. या ठेवींतून उलट इंग्रज व्यापाऱ्यांनाच हलक्या व्याजाने कर्ज मिळतें.. . याप्रमाणे स्टेट सेक्रेटरी हा हिंदुस्थानचा राजा व सावकार आहे. ४ हिंदुस्थानसरकारच्या सर्व कारभारांत व्यापाराचा संबंध आहे. "ज्या . ज्या वेळी सरकार हे व्यापाऱ्यांच्या खाजगी हालचालींत आपल्या