पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९८ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १९ तात्पर्य, हिंदुस्थानाला जे जे हक्क मिळाले आहेत ते हिंदी लोकानींच हिंदुस्थानच्या हिताकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक बजावले पाहिजेत व नवीन कोणचेहि हक्क उत्पन्न होतील तेव्हां ते आपणास असावे अशी दक्षता ठेवली पाहिजे. आपल्या वतीने नेहमी हिंदीच गृहस्थ असावा, त्याने योग्य तयारी करून जावे व परत आल्यावर आपल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करावा व जाहीरपणे सांगून त्यावर चर्चा व्हावी म्हणजे हिंदी राष्ट्राचे लक्ष त्या बाबीकडे लागेल, जगाच्या उलाढालींत आपला हात असावा हे ज्ञान अद्याप हिंदी जनतेस नाही व ही जाणीव तिला व्हावी म्हणून सर्व प्रकारची खटपट आपण केली पाहिजे,