पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य २ कोणत्याहि काळी अत्यंत जरूर व महत्त्वाचे प्रश्न व त्यांचा निकाल 53 करण्याची मांडणी तयार करावी. यागार ३ ही मांडणी तयार करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करणे व तिचा अभ्यास करणे यासाठी निवडक मंडळी शोधून काढून कामास लावावी.PORE ४ या निवडक मंडळींनी गोळा केलेल्या माहितीचे सार व अखेर ठरविलेला निर्णय दरसाल अगर सहामाहीस प्रसिद्ध करावे. ५ सुधारणामंडळाने वेळोवेळी लोकांनी कसे वागावें व काय करावं याबद्दल आपल्या आज्ञा प्रसिद्ध कराव्या.STORE ६ दर एक भागांत ठरलेले निर्णय अमलांत आणण्यासाठी व लाग____णारी माहिती गोळा करण्यासाठी संघांची स्थापना करावी. प्रत्येक भागांत दोन प्रकारच्या माणसांची जरूर आहे. असली माणसे हुडकून काढून त्यांची नोंद ठेवली पाहिजे व त्यांवर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. (१) पुढारी होण्यालायक माणसें व त्यांच्या आवडीचा विषय. ही कर्तव्यदक्ष असून अनेक संस्थांचे सहकार्य कसे करावे हे जाणणारी हवी. (२) काम करणारी माणसे. ही ठरवून दिलेल्या मार्गाने ठरीव काम नीट कळकळीने करतील अशी पाहिजेत. ज्या ज्या भागांत ज्या ज्या विषयासंबंधी कामे करण्यास माणसे मिळतील त्या त्या भागांत त्या त्या विषयाचे काम करणारे संघ स्थापून कामास सुरवात करावी. मग योग्य काळी या संघांचे एकीकरण करता येईल. पुण्यासारख्या शहरांत तिन्ही प्रकारच्या बाबींचा विचार व कामे करणाऱ्या अनेक संस्था निघतील, तर नाशकासारख्या ठिकाणी एकच संस्था निघेल व कित्येक खेडेगांवांत तूर्त एकहि संस्था निघण्यापुरती माणसे मिळणार नाहीत, या संघांत पुष्कळ माणसे मिळाली पाहिजेत असेंहि नाही. जी माणसे मिळतील ती मात्र कळकळीची, हौसेने काम करणारी पाहिजेत व त्यांनी नियमितपणे सारखें काम करीत राहिले पाहिजे. कोणत्याहि प्रदेशानें कोणाकरता वाट पाहूं नये. दोन माणसे एकमताची अगर व्यवसायांची झाली की, संघास सुरुवात झाली. त्यांनी त्या बाबतीत त्या प्रदेशाची पहाणी करावी, त्या बाबीची माहिती गोळा करावी व विचार, निर्णय व आचार या पायऱ्यांनी