पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मध्यवर्ति सरकार २९५ अनुसरून हिंदुस्थानांत सुधारणा सुचवाव्या. मध्यवर्ती सरकार जर संयुक्त संस्थानाच्या दर्जास चढावयाचे असेल तर काम करण्याच्या पद्धती ठरवून टाकाव्या लागतील. धोरणे, पद्धती, व कामें यांचा विचार पुरा झाला की, त्याबद्दल कायदे व शिस्ती घालून टाकाव्या आणि ही तत्वे ठरली असे समजून सर्व राष्ट्रभर त्यांना अनुसरून अंमलबजावणीस सुरुवात व्हावी. या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या सक्तीमुळे स्वायत्त व सुधारलेल्या राज्य पद्धतीकडे सर्व देश जाणार याबद्दलची पावलोपावली खात्री पटेल. याप्रमाणे सुयंत्र व्यवस्था असून शिवाय खालीलप्रमाणे तजवीज झाली पाहिजे. ___ मध्यवर्ती सरकारांत तीन नवे कारभारी नेमले पाहिजेत (१) पुनर्घटनेचा कारभारी (२) परंपरा राखण्याचा कारभारी व (३) मजूर व सांपत्तिक कामांसंबंधी कारभारी. १. पुनर्घटनेच्या कारभाऱ्याने या पुस्तकांत नमूद केल्याप्रमाणे अनेक बाबींची सुधारणा व पुनर्घटना करण्याकडे लक्ष घालावे. परतंत्रतेपासून स्वतंत्रतेकडे नेणाऱ्या व स्वतंत्रतेला पोषक अशा अनेक गोष्टी अमलांत आणण्याचेच काम याला असावे म्हणजे त्या कामाकडे त्याचे पूर्ण लक्ष राहील व त्याने केलेल्या कामाचा जाब त्याला विचारतां येईल. २ नवीन होत असलेल्या व्यवस्था व मागून आलेली पूर्वपरंपरा यांचा वेळोवेळी मेळ घालण्याचे काम परंपरा राखणाऱ्या कारभाऱ्यांचे होय. जुनें हळू हळू सुटत व नवें हळू हळू घेत याने राज्यकारभाराची गाडी नेहमी चालती व रुळावर ठेवली पाहिजे. ३ लोकांना नवीन धंदे शिकविणे, त्यांसाठी नवे कारखाने काढणे, प्रांतिक सरकारला दिलेल्या नव्या अधिकारांचा उपयोग करून सुधारणांना वाव करून देणे व याप्रमाणे सर्व देशाला नवे शिक्षण देऊन वळण लावणे हे काम मजूर व सांपत्तिक कारभाऱ्याकडे राहील. या तिन्ही बाबींचा गेली शंभर वर्षे कांहींच विचार झालेला नाही, म्हणून यासाठी ही तीन नवीं स्वतंत्र खाती निर्माण केली पाहिजेत.