पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संघस्थापना झाला पाहिजे. या तिन्ही संस्थांना वरचेवर चालन देऊन कामाची दिशा आंखून देण्यासाठी प्रत्येक प्रातांत एक एक सुधारणामंडळ पाहिजे. या सुधारणामंडळाचे काम म्हणजे या तिन्ही संस्थांचे कामाकडे लक्ष ठेवून मागे किती काम झाले अद्याप किती काम होणे आहे व ते कोणच्या दिशेने झाले पाहिजे याचा नेहमी विचार करून आढावा घेणे. या मंडळाचे एक त्रैमासिक प्रसिद्ध झाले पाहिजे. त्यांत नेहमी ध्येय व त्याचे मार्ग यांचाच विचार व्हावा. या मंडळाने ज्या ठिकाणी जी उणीव दिसेल ती भरून काढण्यासाठी योग्य ती तजवीज केली पाहिजे. नुसत्या टीका करणें, दोष काढणे यासाठी हे मंडळ नसून दोषांची दुरुस्ती करण्यासाठी हे पाहिजे, लोकमान्यांप्रमाणे अत्यंत थोर अशा शेलक्या मंडळींचे हे मंडळ पाहिजे. राजकीय, सामाजिक व औद्योगिक बाबींचे काम करणारे पुढारी वगैरे निरनिराळे असावे. एकच पुढारी सर्व बाबींत किंवा एकापेक्षा अधीक बाबींत असू नये. अनेक बाबींत पुढारी होण्यास योग्य अशी माणसें सांपडतील ती सुधारणामंडळांत दाखल करावी. हे सुधारणामंडळ सर्व पक्षांपासून अलिप्त पाहिजे. त्याने फक्त हिंदी राष्ट्र या दृष्टीने सर्व कामें पहावयाची आहेत. पक्षभेदाने काम करण्यासाठी संघ आहेतच. एकाद्या सुधारणामंडळाच्या सभासदाला पक्षभेद आवडला तर त्याने त्या मंडळांतून राजीनामा देऊन आपल्या पक्षाचा संघ स्थापावा. तात्पर्य, सत्रांत ज्याप्रमाणे अध्वर्यु, होता, उद्गाता व ब्रम्हा असे चार प्रमुख ऋत्विज असतात त्याप्रमाणे या स्वराज्यघटनेत तत्सदृश औद्योगिक, राजकीय, सामाजिक व सुधारणा ही मंडळे असून त्याचप्रमाणे यांनी कामे करावयाची आहेत. शिवाकोटी वर सांगितलेल्या सर्व संस्थांची साधारण कार्यक्रमाची दिशा खाली दिली आहे.O RTS ENT १ आपले ध्येय स्पष्ट नजरेपुढे रहावे म्हणून पूर्ण ध्येयापर्यंतच्या सर्व म अवस्थांचा व त्यांच्या कामांचा एक नकाशा किंवा तक्ता तयार करणे. या तक्त्यांत आजच्या स्थितीपासून शेवटच्या स्थितीला प्रत्येक बाब कशी जाऊन पोचेल याचे स्पष्ट चित्र रेखाटलेले असावे.