पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ भावी हिंदी स्वराज्य [प्र०१८ व मुसलमान प्रजा फार आहे यासाठी त्यांच्या सुट्ट्या कामाला नडण्यासारख्या असतील त्या द्याव्या. दुपारी कचेरीच नसल्याने केवळ पंचपक्वान्न जेवण्यासाठी सुट्टी नको. दसरा, संक्रांत वगैरे दिवशी अर्धी सुट्टी पुरे, श्रावणी वगैरेस सकाळी अर्धी सुट्टी द्यावी, इत्यादि.. - स्थानिक संस्था त्या त्या परिस्थितीला अनुरूप अशा विविधतेने स्वतंत्रअणे चालवाव्या. पण प्रांतिक बाबींत सरसकट एक नियम ठेवावा व मध्यवर्ति बाबींत एकच पद्धत सर्वत्र असावी. तात्पर्य, हिंदी राष्ट्र, त्याचे नियम, त्याचे आचार वगैरे सर्व देशभर एकजुटीचे असावे. त्याच्या योगाने राष्ट्रांत किंवा प्रांतांत फूट पडू नये अशी तजवीज करावी. प्रांतांत फूट म्हटली म्हणजे राष्ट्रावर घावच पडला व असा. घाव घातक आहे. प्रत्येक़ाच्या हृदयांत हिंदी राष्ट्रीयत्व क्षणोक्षणी व पावलोपावली एकरूप दिसेल अशी व्यवस्था केली पाहिजे व सर्व अक्कल, धोरण व सामर्थ्य याच आगोत वापरावे. .. .. .