पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतिक सरकार | ज्या ज्या हिंदी गृहस्थाने स्वदेश व परदेश पाहिला आहे त्याला त्याला येथील सरकारी नोकर व जनता व परदेशांतील सरकारी नोकर व जनता यांच्या वागणुकीत जमीन अस्मानाचे अंतर दिसते. इतर देशांत अधिकारी हे आपणांस रयतेचे ताबेदार ससजतात व लोकांची गा-हाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हिंदुस्थानांतील अधिकारी आपणांस लोकाचे धनी समजतात व लोकांची गा-हाणी ऐकण्याचा कंटाळा करतात. इतर देशांतील अधिकाऱ्यांचे वर्तन अदबशीर व सभ्यपणाचे असते. पण हिंदुस्थानांतील अधिकाऱ्यांचे वर्तन बेमुर्वतखोर व अरेरावीचे असते. ही स्थिति मोठे हुद्देदार इंग्रज अधिकाऱ्यांचीच आहे असे नाही तर क्षुद्र हिंदी अधिकारी सुद्धा हीच ऐट राखतात... त्याचप्रमाणे परदेशी जाऊन आलेल्या हिंदी गृहस्थास परदेशांत वेळचे वेळी व तत्काळ कामे करण्याची जी शिस्त दिसत ती हिंदुस्थानांत दिसत नाही. ज्या पत्राचे उत्तर इतर देशांत त्याच दिवशी देण्याची वहिवाट आहे असें पत्र हिंदुस्थानांतील कचेऱ्यांत महिनेच्या महिने पडून रहाते व कधी कधी तर त्याचा मुळीच जबाब येत नाही. दुसऱ्या देशांत ज्या बाबींचा निकाल ताबडतोब लागला पाहिजे असे समजतात व करतात त्याच बाबी हिंदुस्थानांतील कचेन्यांत महिन्याचे महिने रखडत असतात.. जर ही बाब न्यायाच्या संबंधाची असली तर मग मुळी बोलूच नये. याबाबद राज्यकारभाराची पद्धतीच बदलली पाहिजे. कामाचे तास, सुट्या वगैरेंबद्दल स्पष्ट निबंध असावे. जास्त वेळ, सुट्टीच्या दिवशी सुद्धां जो काम करील तो नालायक समजावा. हिंदुस्थानासारख्या उष्ण देशांत अकरा वाजतां कामास सुरुवात करण्याची पद्धत चूक आहे. कचेरी, शाळा वगैरे सवें सकाळ संध्याकाळ भराव्या. म्हणजे थंड वेळी तरतरीतपणे काम चांगले व लवकर होते. संध्याकाळी कामें बंद करण्याची वेळ चांगली नाहीं. पांच वाजतां कचेऱ्या सुरू होऊन त्या आठ वाजेपर्यत चालल्या तर बरे होईल. सुट्यासंबंधाने देखील हिंदुस्थानांत असाच अनवस्था प्रसंग आहे. हिंदु, मुसलमान, खिस्ती, पारशी वगैरे सर्व जातींच्या सणांच्या सुट्या येत असल्याने त्या कितीतरी जास्त होतात. याबाबद निर्बध असावे, हिंदी