पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतिक सरकार प्रत्येक तालुक्याच्या, प्रत्येक जिल्ह्याच्या आंत राहणाऱ्या लोकांचें, उत्पन्न । वाढेल अशी तजवीज केली पाहिजे. स्थानिक संस्थांना लहानं तळी, कालवे, रस्ते, ट्रामवे, रेलवे वगैरे लोकोपयोगी कामे करण्याची परवानगी द्यावी व या कामांसाठी प्रांतिक कौन्सिलाने त्यांस नियम घालून द्यावे व त्या नियमांप्रमाणे कामास परवानगी द्यावी. या कामासाठी लागणारे कारागीर, तज्ञ, डायरेक्टर, भांडवल वगैरे त्या जिल्ह्यांतच उभारलेले असेल तर अशा कामें करण्याने लोकांना अतिशय महत्त्वाचे शिक्षण घरच्या घरी मिळेल व या शिक्षणाचा उपयोग पुढे फारच होईल. पहिल्या पहिल्यांदा पुष्कळ ठिकाणी तज्ञ बाहेरून आणावे लागतील पण त्यांवर देखरेख व सत्ता स्थानिक बोर्डाचीच राहिल्याने लोकांना आजपर्यंत ज्या व्यावहारिक शिक्षणाचा गंध सुद्धा नव्हता असें महत्त्वाचे शिक्षण मिळेल. अशा प्रकारच्या कामांमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगांत स्वाभिमान, आत्मविश्वास व स्वावलंबन यांचे वारे खेळू लागेल. याप्रमाणे स्थानिक कारखाने काढण्यांत शिक्षणाच्या व उत्पादक धंद्याच्या बाबींत दिवाणाला आपले कौशल्य पुष्कळ दाखविता येईल. एक कोट रुपये खर्चुन जागोजाग शेतांस पाणी पुरवण्यासाठी तलाव बांधले तर भांडवलावर व्याज मिळून शिवाय शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्न एक कोटीने तरी वाढेल. त्याचप्रमाणे पाण्यापासून वीज उत्पन्न करण्याच्या कारखानदारांना तज्ञांची मदत देऊन कामें केली तर व्याज मिळून उद्योगधदवाल्यांचे उत्पन्न वाढेल, किंवा टामवे, रेलवे, खाणी वगैरेसारखे धंदे व कारखाने सार्वजनिक पैशांनी व सार्वजनिक देखरेखीखाली काढले तर पुष्कळ हित होणार आहे. ' या गोष्टी निव्वळ कागदावर न रहातां म्हैसूर संस्थानाने आपल्या संस्थांनांत करून दाखविलेल्या आहेत. जा. त्याचप्रमाणे प्रत्येक खात्यावर नजर ठेवून त्याचा कारभार सुधारावा म्हणून सरकारी नोकर नसलेल्या लोकांचे एकएक सल्लागार मंडळ नेमावें. या मंडळाच्या योगाने त्या त्या खात्याची माहिती लोकांना मिळेल व लोकांची नजर त्या खात्यावर राहील. याशिवाय काही खात्यांच्या कारभारांत सुधारणा सुचवाव्या म्हणून स्वतंत्र लोकांची कमिशनेंहि नेमावीत.