पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-प्रांतिक सरकार भाग व त्याची त्या गोष्टीला अनुसरून स्वतंत्र व्यवस्था अशी पद्धत पाहिजे. हल्लीच्या कायद्यांत याबाबद खालीलप्रमाणे व्यवस्था केली आहे.) २ कोणत्याहि प्रांतिक कायदे कौन्सिलला धर्म, जात, भाषा याला अनुसरून जिल्हे अगर भाग यांची वाटणी करावी असे वाटले तर त्यांनी स्टेट सेक्रेटरीस कळवावें. मग स्टेट सेक्रेटरीने चौकशी करवून मग तसे करावें. नंतर त्या प्रांतिक कौन्सिलच्या बहुमताला ही गोष्ट पसंत नसली तरी हरकत नाही. साधारणपणे एक ते तीन कोट लोकसंख्येचा एक एक प्रांत असावा. यापेक्षा लहान प्रांत झाला तर त्याचे उत्पन्न पुरे होणार नाही; व मध्यवर्ती सरकारची भीड त्याला मोडवणार नाही. याहून मोठा प्रांत झाला तर त्यांत विविधता वाढून युनिव्हर्सिटी, धंदे, व्यापार, शेती वगैरेबाबद निरनिराळे भाग करावे लागतात. यासाठी साधारणपणे दोन कोट लोकसंख्येचा भाषा आचार, रिवाज वगैरेंनी समता असलेल्या लोकांचा एक भाग करावा. प्रांतिक सरकारने पहिल्याने विचारांत घ्यावयाच्या गोष्टी म्हणजे खेड्यांतील लोकांची संख्या वाढविणे, उद्योगधंद्याच्या शिक्षणाचा सर्वत्र प्रसार करणे व प्रांताचें (प्रांतांतील लोकांचे) उत्पन्न वाढविणे ही होत, या तिन्ही गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. उद्योगधंदे वाढले म्हणजे उत्पन्न वाढेल. शिक्षणाचा प्रसार झाला म्हणजे उद्योगधंदे वाढतील. शहरांतील गर्दी मोडून खेडगांवांतील वस्ती वाढण्यास उद्योगधंदे वाढले पाहिजेत. तात्पर्य, धंदे शिक्षण व कारखाने काढणे हे पहिले सुरुवातीचे काम व मग यापासून इष्ट त्या गोष्टी आपोआप होत जातील, यासाठी त्यांच्या होण्याला उत्तेजन दिले पाहिजे. शेतीवर निर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हावी म्हणून उद्योगधंदेच वाढले पाहिजेत. उद्योग धंद्याच्या वाढीनेच उत्पन्नाचीहि वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे लोकांची रहाणी सुधारावी, ते संपन्न व्हावे असे वाटत असेल तर त्यांना शिक्षण दिलें पाहिजे. तात्पर्य, पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण, विशेषतः धंदेशिक्षण व कारखाने काढणे ही होय; हिच्यापासून आपल्याला आपले काम सुरू केले. पाहिजे.