पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। प्रांतिक सरकार २७९ भाग वगळावा अशा बेताने कामें चालली पाहिजेत. या ओढाताणीच्या पहिल्या काळांत आपणाला माणसे फार जपून निवडली पाहिजेत. अधिकाऱ्यांना त्यांच्या कोटांतून बाहेर काढून देऊन त्यांची सूत्रे आपल्या हाती आणण्यास फार चातुर्य लागते. नाखुष माणसाकडून आपले काम करून घेणे ही अवघड कला आहे, राजकारभारांतील या ओढाताणीची कल्पना इंग्रजांना आहे. हिंदुस्थानचे एक अंडर सेक्रेटरी हाउस ऑफ लार्डस्मध्ये असे म्हणाले की, "रिझर्व खात्यांचा कारभारसुद्धां अतःपर जपून केला पाहिजे. कारण सर्व अंदाजपत्रक लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधि मंडळाने मंजूर करावयाचे आहे आणि ज्या गोष्टी यांना पसंत पडतील त्याच अखेर सिद्धीस जाणार आहेत. यासाठी लोकांना पसंत ते सरकारला पसंत असे धोरण सरकारने ठेवले पाहिजे." निदान हिंदी कौन्सिलर्सनी तरी हे धोरण ठेवावे. एकंदर राज्यकारभाराचा विचार केला तर दिवाण बरेच नेमावे लागतील. कारण कामें पुष्कळ करावयाची असून त्याला थोडे दिवाण पुरणार नाहीत. दिवाण वगैरेंना पगार मात्र तीन हजारांपेक्षा जास्त नसावा. कानडांतील प्रधानांना फक्त १७५० रुपये व जपानांतील प्रधानांना बाराशे रुपये पगार आहे. इंग्रज नोकरांना जास्त पगार द्यावा लागत असल्यामुळे हिंदुस्थानांतील सर्वच नोकरांना पगार जास्त आहेत व त्याचमुळे सरकारी नोकर सरकारच्या इतराजीला फार भितात. ज्या माणसाला बाजारांत कोणी दोनशेला विचारणार नाही त्याला पांचशे पगार मिळाला म्हणजे तो साहजीकच भिऊन भिऊन मरतो. 1. प्रत्येक खात्याला दोन दिवाण असावे. एकाने नवीन विचार करून सुधारणा घडवून आणण्याकडे लक्ष द्यावे व दुसऱ्याने फक्त चालू काम पाहून प्रश्न वगैरेंचे जबाब द्यावे. रोजचे आखलेले काम करण्यांत गुंग झालेला मनुष्य त्या कामाच्या अडचणीतच गुरफाटलेला असतो; त्याला मोकळेपणे विचार करून सुधारणा व नवीन योजना यांजकडे लक्ष देण्यास होत नाही. शिवाय बारीक सारीक बाबींची चौकशी करणाऱ्या माणसाला विशाल विचार करण्याची संवय नाहीशी होते. सूक्ष्मदर्शक यंत्राप्रमाणे रोजचे काम करणारा इसम असतो. पण योजना करणारा इसम दूरवीक्षण