पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[प्र० १८ २७८ भावी हिंदी स्वराज्य आपले खात्यांत काटकसर केली पाहिजे, स्वार्थ, तात्कालिक फायदा, आपल्या कामाची सोय यांपेक्षां दीर्घकालीन हिताकडे त्यांनी जास्त लक्ष दिले पाहिजे, या उत्पन्नाच्या वाट्याच्या ओढाताणीत एकवाक्यता झाली नाही तर मागील सालाप्रमाणे ती वांटणी असावी असा नियम आहे. पहिल्या निवडणुकीच्या वेळी मागील सालांतील वांटणी कायद्याचे होणारे धोरण पाहून दिवाणांकडे जाणाऱ्या खात्यांला कमी हिस्सा दिला असेल, nha काजी कायदा करणारांनी मतदार नवीन आहेत, ते चुका करतील, दिवाणांना अनुभव नाही, तेही कामांत चुका करतील हे गृहीत धरले आहे; पण त्याचप्रमाणे अधिकाराबाहेर जाणारे लोक अधिकार सोडण्यास खुष नसतील हे गृहीत धरलें नाही ही मोठी चूक केली आहे. अधिकारी लोक अधिकार सोडण्यास नाखुष असणार व दिवाणांना कामांत मदत करणारे अधिकारी हेच यासाठी दिवाणांच्या कामांत अनेक अडचणी उत्पन्न करतील ही गोष्ट कायदे करणारांनी डोळ्याआड केलेली आहे. यासाठी दिवाणांच्या हाताखालील नोकरांची बढती व बहाली सर्वस्वी दिवाणांच्या हाती पाहिजे होती. त्यांत दुसऱ्या कोणाचा संबंध नसावा, असे पाहिजे होते. हा जो कायद्यांत दोष आहे त्याचे निराकरण केवळ जुटीनेच आपल्याला करता येईल. प्रत्येक जण जर हिंदुस्थानाच्या कल्याणासाठी झटूं लागेल तरच हे काम होणार आहे. मतदारापासून तों येट एक्झिक्युटिव्ह कौन्सिलरपर्यंत सर्वांनी एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे व ते म्हणजे हिंदुस्थानचे कल्याण. हे हिंदुस्थानचे कल्याण सगळी सत्ता हिंदी लोकांच्या ताब्यात आल्याने होणार आहे. तेव्हां एक काळागोरा हा भेद. सर्व हिंदी म्हणजे एक असा परिपाठ पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कायदे कौन्सिलाची संमति पाहिजे या एकाच गोष्टीवर आज आपणांस हिंदुस्थानचे कल्याण करता येणार आहे. कोणतीहि गोष्ट कौन्सिलपुढे आली की, तींत हिंदुस्थानचे कल्याण किती हे पाहण्याची ज्याला अक्कल असेल, हे ओळखण्याची ज्याला माहिती असेल, गुंतागुंतीच्या प्रश्नांचा उलगडा करण्याची ज्याला संवय असेल असाच मनुष्य या कामासाठी निवडला पाहिजे, मग कल्याणाचा तेवढा भाग घ्यावा व अकल्याणाच