पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०१ - तूर्त पहिली गोष्ट म्हणजे पुढारी लोकांनी जनतेला विचार करण्यास प्रवृत्त करावे व नियमितपणे वागण्याची सवय लावावी. आपल्यांत अमुक उणीवा अगर दोष आहेत हीच जाणीव जनतेत नाही. ही जाणीव झाली म्हणजे त्या उणीवा आपणच आपल्या संघसामर्थ्याने भरून काढाव्या व स्वराज्य मिळवीपर्यंत सरकारची जशी सर्व खात्यांची रचना आहे त्या रचनेला अनुसरून प्रत्येक खात्याबद्दल विचार करणारे संघ वर लिहिल्याप्रमाणे स्थापन झाले पाहिजेत. स्वराज्यांत ज्याप्रमाणे राजसत्तेत काम करणारी काही माणसे व राजसत्तेबाहेर तेच काम करणारी दुसरी माणसे असे पक्ष पाहिजेत व या पक्षांत नेहमी अदलाबदल होणार त्याच धर्तीवर एकाच बाबीचा विचार करणारे सरकारी अधिकारी व स्वतंत्र लोक अस दोन पक्ष पाहिजेत. हल्ली सरकारी तज्ज्ञ एकजुटीने काम करणार असून जनता मात्र अज्ञानी व फूट पडलेली अशी आहे. ही स्थिति बदल्न जनतेतहि प्रत्येक बाबीचे खातेवार संघ, त्या संघाची घटना व नमा टापटिपीने काम करण्याची संवय घुढाऱ्यांनी लावली पाहिजे. स्तराज्यात सर्व कामें फुकट करणारी माणसे लागणार व ती आपण आतापासून तयार करण्याच्या उद्योगाला लागले पाहिजे. प्रत्येक गांवांतील चार घुढायांना एकेका बाबतीत स्वतंत्रपणे दोन वर्षे काम करूं देऊन त्या वषात त्यांनी काय काम केले याचा आढावा घ्यावा. मग दुसरे चार इसमाकड दोन वर्षे तेच काम द्यावे व एका विवक्षित दिशेने काम चालू ठवाव. सर्व हिंदुस्थानच्या घटनेत (१) हिंदुस्थान, (२) प्रांत, (३) जिल्हे, (४) तालुके, (५) शहरे, (६) गांवें व (७) खेडी इतक्या प्रकारचे प्रत्येक बाबाच संघ पाहिजेत. त्याचप्रमाणे या संघांचे राजकीय, सांपत्तिक व सामाजिक असे तीन प्रकार पाहिजेत. राजकीय बाबींचा विचार करणारी राष्ट्रीयसभा व तिच्या शाखा वगैरे घटना तयार आहे. सांपत्तिक बाबींचा विचार करणारी व सामाजिक बाबींचा विचार करणारी अशा दोन संस्था औद्योगिक व सामाजिक परिषद नांवाच्या आस्तित्वात आहेत. पण त्यांच्या शाखा पोटशाखा व घटना खेड्यापाड्यापर्यंत गेलेल्या नाहीत. त्या स्थापन करून त्यांचे काम व्यवस्थित होईल असे करावयास पाहिजे. या बाबींचा वर्तमानपत्रहि निघाली पाहिजेत व त्यांत याच बाबींचा वर्षभर खल