पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ भावी हिंदी स्वराज्य [प्र०१७ साध्य आहेत. स्थानिक संस्थांत आपण लक्ष घातले नाही, जरूर ती व्यवस्था करण्याची मेहनत व कष्ट केले नाहीत तर वरच्या पायऱ्यांचे काम आपल्या हातून व्हावे तसे होणार नाही. गांवतल्या गांवांत ज्याला रोज दोन तास या कामाकडे देता येत नाहीत तो परगांवीं राहून रात्रंदिवस देशाचे काम कसें करील ? व अशी कामें करणारी, कळकळीने कामें करणारी माणसे मिळाली नाहीत तर मग कसले स्वराज्य व कसल्या गोष्टी ! अशाने स्वराज्य मिळणे दुर्घट, मिळाले तर टिकणे दुरापास्त व टिकलें तरी देशाचे कल्याण होणे अशक्य, अशा स्थितीत या गोष्टी केवळ शब्दांतच राहणार हैं पके समजावे. व यासाठी ताबडतोब कामास सुरवात करावी.