पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थानिक स्वराज्य २७५ जिल्ह्याच्या काय उणीवा आहेत याबाबद सरकारी जिल्ह्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा व वाटाघाट व्हावी व जिल्हा लोकलबोर्डाच्या बजेटावर या असेंब्लीने चर्चा करून ते पास करावें. बोर्डाला ज्या, सूचना असेंब्ली करील त्या त्याने मान्य कराव्या व अंमलात आणाव्या. प्रांतिक सरकारचा जिल्ह्याशी जो संबंध येईल त्याचा विचार ही असेंब्ली करील. ही असेंब्ली जिल्ह्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामांत सल्ला देईल व सरकारी अधिका-यांनी केलेल्या कामाची चर्चाहि करील, धंदेशिक्षण, कारखान्यांना सवलती. वगैरे बाबतींत त्या त्या.. खात्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना ही असेंब्ली सल्ला देईल व या असेंब्लीच्या बैठ. कीच्या वेळी अधिकान्यांना तिला आपली सल्ला देता येईल, याप्रमाणे अधिकारी व असेंब्ली यांत मोकळ्या मनाने विचारविनिमय व्हावा. ____ जिल्ह्याचे सरकारी अधिकारी व जिल्ह्याचे लोकल बोर्ड यांनी लोकांना प्रातिनिधिक संस्था चालविण्याचे शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या सर्व खाजगी प्रयत्नांना मदत केली पाहिजे. या शिक्षणांत नागरिकांचे कर्तव्य, सभ्यपणा, देशाभिमान, शिस्त व काटकसर या बाबींकडे विशेष लक्ष दिले जावें. अतःपर प्रांतिक सरकारच दिवाण व जिल्ह्याचे अधिकारी यांनी जिल्हा असेंब्लीच्या मार्फत लोकांनी कसे वागावे व जिल्ह्याच्या कामांत सुधारणा वगैरे व्हाव्या म्हणून त्यांस कशी मदत करावी याची उपदेशपत्रके किंवा मागण्या कराव्या. लोकांचे जे पुढारी असतील त्यांनी ताबडतोब आपल्या जिल्ह्यांत कोणच्या सुधारणा पाहिजेत व त्या कशा कराव्या याबद्दलची टिपणे तयार करावी. याबाबद लोकांना शिक्षण द्यावे व त्या गोष्टी लोकांस पटाव्या म्हणून वर्तमानपत्रांतून त्यांची चर्चा सुरू करावी. तसेच पैशाचा खर्च, श्रम, तयारी व अभ्यास केल्याशिवाय सर्व गोष्टी यथावकाश आपोआप मिळतील हा लोकांचा झालेला भ्रम घालविला पाहिजे व त्यांना पैसे खर्चुन स्वार्थत्याग करण्यास तयार केले पाहिजे. या उद्योगाला आतांच लागावें. याबाबद पुढील सर्व व्यवस्था स्थानिक बाबींत आपण जे कायदे करूं व जी मेहनत घेऊं त्यावर अवलंबून राहणार आहे. स्थानिक संस्था उत्तम नमुन्यावर आपण चालवू लागलों की, वरच्या पायऱ्या आपणांस सुलभ 4