पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १७ त्यांजपासून रीतसर पैसे बोर्डीना वसूल मिळतील, लोकलबोर्डाचे मुख्य काम म्हणजे त्या जिल्ह्यांत उत्पन्न होणाऱ्या मालाची निपज वाढविण्यासाठी व त्याचा चोहोकडे पुरवठा करण्यासाठी लागणारी साधने तयार करून देणे हे होय. अशी कामें केल्याने त्या जिल्ह्यांतील लोकांचा फायदा होऊन बोर्डालाहि एक उत्पन्नाची बाब होईल. अशा प्रकारची कामें करण्यास हिंदुस्थानांत पुष्कळ वाव आहे. उदाहरणार्थ नाशीक जिल्ह्यांत अनेक बंधारे आहेत व आणखी होण्यासारख्या जागा आहेत. तेथे पडणाऱ्या पाण्यापासून वीज उत्पन्न केली, वाऱ्याचा उपयोग कामे करण्याकडे केला, उन्हाने वाफेची यंत्रे चालविली तर होण्यासारखे आहे. पण पहिल्याने सरकारने सुरुवात करून त्यांत नफा आहे असे दाखवून ती कामें लोकांकडे सोपविली पाहिजेत. बोर्डाला करावयाची कामे त्या जिल्ह्यांतील लोकांकडून नच कर वावी. ही कंत्राटे घेण्यांसाठी जरूर त्या कंपन्या त्या जिल्ह्यांतील लोकांकडूनच स्थापवाव्या म्हणजे लोकांना हा व्यवहार समजेल, लोकांना धंदा मिळेल, कामे करून घेण्याची माहिती होईल व जुटीने काम करण्याचे शिक्षण मिळेल व वळण लागेल. म्युनिसिपालिट्या वगैरेप्रमाणेच लोकलबोडीत देखील दोन कमेट्या पाहिजेत. एकीकडे नव्या सुधारणा व योजना अमलांत आणण्याचे काम व दुसरीकडे अंमलांत आलेल्या योजना संभाळण्याचे काम द्यावे. या जातिक तालुक्यासाठी बोर्ड नको. जिल्हा बोर्डाचे नोकर व जिल्हा बोर्डाची कमेटी यांनी तालुक्यांतील कामें पहावी. मात्र ज्या ठिकाणी लोकसंख्या, क्षेत्र अगर ऐपत जास्त असेल तेथे जिल्हा बोर्डाच्या धर्तीवरच तालुका बोर्ड स्थापावे. या दोन बोर्डीत फक्त विस्ताराचीच तफावत; बाकी कामाची पद्धत एकच रहावी. तालुका बोर्ड निराळा स्थापन केला म्हणजे त्या ठिकाणी जिल्हा बोर्डाचे काम, त्या तालुका बोर्डाचा आपल्या कामाशी मेळ पहाणे इतकेच राहील. तालुका लोकलबोर्ड, जिल्हा लोकलबोर्ड व जिल्ह्यांतील मोठ्या म्युनि'सिपालिट्या यांनी निवडलेल्या सभासदांची एक डिस्टिवट असेंब्ली असावी. या असेब्लीची बैठक दर तिमाहीस एक व्हावी व या बैठकीत त्या