पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थानिक स्वराज्य भुवने, घरभाडे व सोई, धंद्यांसाठी सोई, धर्मादाय इतक्या बाबी यांची नोंद करावी. प्रत्येक पेठेतील समंजस लोकांनी हे काम करावे व तज्ञांची या कामांत त्यास सल्ला मोफत मिळावी. या पहाणीचा निष्कर्ष व सुधारणांची योजना छापून लोकांपुढे चर्चा व अंमलबजावणी यासाठी मांडावी. पांच हजारापासून वीस हजारांपर्यंतच्या गांवांना हिंदुस्थानांत 'कसबे' म्हणतात. गांव व शहर यांच्या दरम्यान हे कसबे येते. यासाठी ग्रामसंस्था व म्युनिसिपालिटी यांचे दरम्यान या गांवाचा कारभार पहाणाऱ्या संस्था येतात. यांना नव्या म्युनिसिपल कायद्यांत 'मायनॉर म्युनिसिपालिटी' किंवा बाल म्युनिसिपालिटी म्हटले आहे व शहरचा कारभार पाहणाऱ्या संस्थेस 'मेजर' किंवा प्रौढ म्युनिसिपालिटी म्हटले आहे. 'कसबे हैं नांवच या गांवांत काहीतरी विशिष्ट कसब किंवा कुशलतेचा धंदा चालत असावा हे सुचविते. शहराप्रमाणेच या ठिकाणी सर्व व्यवस्था पाहिजे. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी वगैरे बाबींत कसबी अद्याप फार मागासलेली आहेत व यांना योग्य ती मदत करून पुढे आणली पाहिजेत. जिल्ह्याचा एकंदर कारभार जिल्ह्याच्या लोकलबोर्डाकडे असून त्या बोडीत जिल्ह्यांतील ग्रामसंघ व बाल म्युनिसिपालिट्या यांनी निवडलेले लोक असावे. या जिल्हा बोर्डाची निवडणूक सर्व सभासदांची एकदम न करतां दरसाल एकतृतीयांश याप्रमाणे करावी. हे लोक आपल्या कामाला अद्याप अनभ्यस्त असल्याने याप्रमाणे नव्या जुन्याच्या मिश्रणाने काम बरें होईल. सगळ्या जिल्ह्यांतील कामें व व्यवस्था या बोर्डाच्या हातांत पाहिजे. या बोर्डाच्या हाताखाली एक पगारी सेक्रेटरी व पगारी कामें करणारी माणसे असावीत. या बोर्डीकडे सक्तीचे शिक्षण, रस्ते, वाटा, पूल, पाणीघुरवठे, सांडपाण्याची व्यवस्था, जनावरांची जोपासना, धर्मशाळांची व्यवस्था, आरोग्य, दवाखाने वगैरे गोष्टी सर्वस्वी सोंपवाव्या. या बोर्डाला लोकल फंडाचे उत्पन्न, ग्रामसंस्था व म्युनिसिपालिट्या यांची वर्गणी व सरकारची मदत इतके पैसे खर्च करण्याचा अधिकार असावा. गांवोगांवचे कर गांवचे पाटीलच वसूल करतील व त्या वसूलांपैकी कायद्याने ठरलेली रक्कम लोकलफंड म्हणून या बोर्डीच्या ताब्यांत मिळेल. याशिवाय रेलवे, ट्रामवे, पूल, बंधारे, पाट, वीज वगैरे गोष्टींपासून ज्यांना फायदा होईल भा...हिं...स्व...१८