पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १७. त्या अमंलांत आणाव्या. सुधारणा बोर्डाकडे नगररचनेतील सुधारणापासून घरांतील व्यवस्थेच्या सुधारणापर्यंत लोकांच्या सर्व सुखसोईच्या सुधारणांचा विचार व काम सोपवावे. लोकांना उद्योगधंदे, पोटापाण्याची सोय लावून देणे ही सुद्धा सुधारणेचीच बाब होय. ज्या बाबी म्युनिसिपालिटीच्या कायदेशीर कार्यक्षेत्रांत येणार नाहीत त्या सुधारणा जनतेचे संघ, कंपन्या वगैरे स्थापून करवाव्या. प्रत्येक म्युनिसिपालिटीच्या मालकीच्या खालील गोष्टी पाहिजेत. (१) सार्वजनिक दिवाणखाना (२) कमेटीची कचेरी (३) वाचनालय (४) पुस्तकसंग्रह (५) व्यापारी व धंदेविषयक प्रदर्शन, (६) चौकशी व माहिती पुरविणारी कचेरी व (७) प्राणिदुःखनिवारक संस्था. प्रत्येक कमेटीने धंदे, व्यापार, कारखाने व पेढ्या यांना आपल्या हद्दीत सवलती देऊन स्थापवाव्या व शहर म्हणजे आसपासच्या गांवांना लागणारा माल तयार करण्याचे व पुरविण्याचे क्षेत्र करावें. आपल्या प्राचीन धर्मसूत्रांत नगरांचे हेच वैशिष्टय सांगितले आहे. नगराणि करवर्जितानि यंत्रसाराणां निगम वणिजांच स्थानानि' धर्मसूत्रं. मोठे कारखाने व व्यापारी उलाढाली चालविणारी गांवें म्हणजे नगरें व यांवर राजाचे कर नसावे असें हैं बौद्धसूत्र सांगते. यासाठी नगराच्या ठिकाणी व्यापारी संघ, धंदेवाइकांच्या पेट्या, शेतकरांच्या पेंढ्या, अडत्यांचा संघ, कारागिरांचे समाज अशा संस्था असाव्या व त्यांनी आपआपल्या परीने त्या शहराची भरभराट करण्यास झटावें. कोणतेहि शहर स्वयंसेवकपथक, बालसंस्था, आरोग्यभुवन ( दवाखाने), अन्नछत्र, मिनसमाज व स्वोद्धार मंडळ यावांचून पूर्ण समजण्यांत येऊ नये. एकंदर शहरांत कोणत्या उणीवा आहेत, त्या भरून काढण्यासाठी यंदा काय केले, पुढल्या साली काय करण्याचा बेत आहे व किती काम उरलें याचा अहवाल सुधारणा बोर्डाने दरसाल जाहीर करून त्यावर लोकांना चर्चा करण्यास फुरसद द्यावी. म्युनिसिपालिटीच्या कामाचा असाच अहवाल दरसाल मतदारांपुढे वाचून त्यांस त्यावर चर्चा करूं द्यावी. सुधारणा बोर्डाने सगळ्या गांवाची लांबवर नजर देऊन पहाणी करावी. या पहाणींत जन्ममरण, रोगराई, शिक्षण, उत्पन्न व व्यापार इतक्या गोष्टी, व्यवसाय, धंदे, शहर सफाई, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा