पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थानिक स्वराज्य २७१ हाती घेण्यासारखी पुष्ळक कामें उरतीलच, प्रत्येक संघांत एक सक्तीचे व घदेशिक्षणाचे विद्यालय असावें, एक सभागृह अगर चावडी, वाचनालय, पुस्तकालय, एक शेतीसंस्था, सहकारी औद्योगिक संस्था, गांवची लोकपयोगी काम करणारी संस्था, धंदे चालविणारी व उत्तेजन देणारी संस्था, भारत सेवक संस्था, दानधर्म संस्था, व त्या त्या परिस्थित्यनुरूप अनेक सहकारी संस्था असाव्यात. या संस्था सुरू करण्याचे काम संघाचे मंडळ व मतदारसंघ यांनी एकमेकांस सहाय्य करून करावे. याबाबद संघटना कशी करावी हे मागें 'संघटना' या सदराखाली तपशीवार सांगितले आहेच. एकएका संस्थेत चारदोनच सभासद असावेत पण त्यांनी आपली सर्व फुरसत त्या एका कामाकडेच लावली पाहिजे. आपणांस नुसत्या गप्पा, तोंडाच्या बाता माराव शच्या नसून प्रत्यक्ष कामे करून दाखवावयाची आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे, अशा त-हेनें ग्रामपंचायतींची रचना केली तरच स्वावलंबन, स्वसुधारणा व स्वराज्य यांचा पाया घालणे, वाढ व पोषण करणे व उपयोग करून दाखविणे शक्य आहे. मगच हिंदुस्थानांतील खेडी सुंदर, बाळसेदार व सामथ्र्यसंपन्न होतील. एकदां लोकांना याप्रमाणे आत्मविश्वास उत्पन्न झाला म्हणजे त्या जोरावर मोठमोठी साम्राज्य उभी करता येतील. हिंदुस्थानांत वीस हजार अगर त्याहून जास्त लोकसंख्येच्या गांवाला शहर म्हणण्याचा प्रघात आहे व ही लोकसंख्या जसजशी जास्त असेल त्या मानाने त्या शहराची कामे करण्याची ऐपत व सामर्थ्य जास्त असणार. अशा गांवांची व्यवस्था म्युनिसिपालटी नांवाच्या संस्थकडे असते. या संस्थांचे कायदे प्रांतिक काउन्सिल पास करते व लोकल गव्हमेंट बोर्ड नांवाच्या सल्लागार मंडळाची यांवर देखरेख असावी. दरएक म्युनिसिपालिटींत म्यानेजिंग बोर्डाबरोबर एक सुधारणा बोर्ड पाहिजे. नेहमींची कामें चालू स्थितीत ठेवण्याचे काम म्यानेजिंग कमेटीकडे व शहरांत नव्या सुधारणा कोणत्या पाहिजेत हे ठरवून त्या अस्तित्वात आणण्याचे काम सुधारणा बोर्डाकडे द्यावे. सुधारणा बोर्डाने कोणत्या सुधारणा पाहिजेत, त्या इतर ठिकाणी कशा केल्या याबद्दल माहिती गोळा करून लोकांस सांगावी व त्या करण्याची गोडी त्यांत उत्पन्न करून त्यांच्या सहकार्याने