पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० भावी हिंदी स्वराज्य [प्र० १७ नुकसान भरून दिले पाहिजे. ज्याप्रमाणे विमा कंपन्या डाक्टर, उपदेशक, आग विझविण्याची यंत्रे, बुडलेल्या आगबोटी काढण्याची यंत्रे वगैरे ठेवतात त्याप्रमाणे निरनिराळे अधिकारी, पोलीस, सैन्य ही या विमा कंपनीची नुकसान भरून देण्याची अगर घेण्याची साधने आहेत असे त्याचे म्हणणे आहे. वर जी ग्रामांची संघ करण्याची पद्धत वर्णन केली ती हिंदुस्थानांत लागू करण्यासारखी आहे. या लागू करण्यामुळे जमाबंदी अगर शांतता याबाबदची चालू व्यवस्था मुळीच बदलावी लागणार नाही. दर एक पांच चार गांवांचा एक एक संघ करावा. मध्यवर्ती गांव त्या संघाचे मुख्य ठाणे ठरवावें, पातळ वस्तीच्या दहाबारा वाड्यांचा संघ करावा; तसेच मोठ्या एका गांवाचाच संघ म्हणावा. हे संघ स्वराज्याचे मूल घटक होत. एका संघांतील गांवांनी दहाबारा मंडळींचे एक संघाचे राजमंडळ निवडावें या राजमंडळाचे दोन भाग करावे. एका भागाने चालू कामें चालवावीं व नवीं सुरू करावी व दुसऱ्या भागाने नित्य विचार करून कोणत्या सुधारणा कशा करता येतील याचा विचार करावा. संघाच्या मंडळाने लोकांजवळून कर घ्यावे व वर्गण्या गोळा कराव्या. पैसे अगर त्या किंमतीचे श्रम अगर सामान हे वर्गणीत जमा धरावें. या उत्पन्नांतून त्या संघाच्या हद्दीतील रस्ते, पाट, पाणी पुरवठा, सांडपाणी, घाणीची व्यवस्था, झाडे लावणे अगर त्या हीत चालविता येण्यासारखे लहान कारखाने काढणे व चालविणे ही का में करावी. या कामांचा विस्तार त्या लोकांची बुद्धि, शक्ति व ऐपत व एकाने काम करण्याची हातोटी अगर जूट यांवर अवलंबून राहील. पहिल्याने लोक या कामांना पैसे देण्यास नाखुष असतील पण त्यांना हे पैसे केवळ आपल्या संघाच्याच उपयोग व सुधारणासाठी आपल्याच हातून खर्च होतात असे दिसेल तेव्हां त्यांचा रोष पार जाईल. हे स्थित्यंतर ज्या वेळी या सुधारणांमुळे शेतीचे पीक, गांवचे धंदे, लोकांचे उद्योग वाढण्यांत होतो व त्यामुळे संघाची स्थिति सुधारते असे दिसेल तेव्हां तर कराऐवजी ते वर्गण्या अगर उसने पैसे देण्यास कबूल नव्हे उत्सुक होतील. या ग्रामपंचायतीसाठी जरूर ते कायदे प्रांतिक कायदेकाउन्सिल करीलच; तरी पण यांशिवाय जिल्ह्यांतील समंजस व धनिक लोकानी