पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] स्थानिक स्वराज्य २६९ पंचाहत्तर संघांना सरकारांतून खास बक्षिसें म्हणून रकमा देण्यात आल्या होत्या." हा लेखक स्वतः कंदाहारपर्यंत अफगाण हद्दीत गेला होता. तेव्हां तेथे इतकी व्यवस्थित पद्धति नव्हती तरी गांवच्या पंचांना मुलकी, फौजदारी व दिवाणी कामांचा निकाल करण्याचा अधिकार होता व त्यामुळे गांवांत पंचांचे वजन असून व्यवस्था उत्तम होती. इंग्रजी राज्यांतील न्यायपद्धतीची अफगाण लोक खालीलप्रमाणे चेष्टा करतात. " इंग्रजी राज्यांत मारामारी झाली तर मार खाणारा इसम न्यायाधिशाकडे फिर्याद करतो. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायाधीश म्हणतो 'तुझ्या एकट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण जर चार सभ्य गृहस्थ तुझें म्हणणे खरे आहे असे सांगतील तर मग त्यावर विश्वास ठेवता येईल.' मग तो गृहस्थ चार सभ्य गृहस्थांना ( साक्षीदारांना ) आणून रुजू करतो व न्यायाधीश त्याचे म्हणणे ऐकून घेतो. (खरें म्हटले तर येथे न्यायाधिशाने निकाल द्यावयाला पाहिजे ) मग न्यायाधीश मारणाराला बोलावून विचारतो. तो ठरल्याप्रमाणे मारल्याचें नाकबूल करतो. मग त्यालाहि चार सभ्य गृहस्थ (साक्षीदार ) आणण्यास सांगण्यांत येते व तो त्यांना घेऊन येतो. यांचे म्हणणे ऐकल्यावर मग न्यायाधीश आपल्याला वाटेल तो न्याय देतो. आपला जर साक्षीदारांवर विश्वास नाही तर त्यांनां कचेरीत आणवावे व शिणवावें कशाला? दोघांचे म्हणणे ऐकून खरें वाटेल त्याप्रमाणे न्याय द्यावा झालें. सभ्य गृहस्थांना बोलावून त्यांना अविश्वासूक म्हणणे फार गैर आहे. तसेच इंग्रज सरकार झालेली चोरी कधीच भरून देत नाही. चोरी होते ती सरकारच्या बंदोबस्तांतील कमीपणामुळे व यासाठी चोरी सरकारने भरून द्यावी अगर चोराकडून भरून देववावी पण तसे इंग्रज सरकार करीत नाही. आपल्या प्राचीन धर्म व अर्थ शास्त्रांतून राजाने चोरीची किंमत चोराकडून भरून देववावी अगर आपल्या खजिन्यांतून भरून द्यावी असे सांगितले आहे. राजा जो षष्ठांश सारा घेतो तो मालमत्ता व जीवित यांच्या संरक्षणाच्या विम्याचा हप्ता आहे; व जोपर्यंत कोणी इसम तो हप्ता वेळचेवेळी भरीत आहे तोपर्यंत या विमा कंपनीने ( सरकारने ) झालेले