पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १७ " त्या संघांत पांच गांवे असून त्याचे क्षेत्र चोवीस चौरस मैल होते. - त्याची लोकसंख्या ५.४९३ होती. त्या संघांत दहा पेठा व पन्नास आळ्या होत्या. त्या संघाचा एक मुख्य होता त्याला सांको (मुखी) म्हणतात, हा मुखी त्या संघाच्या लोकांनी निवडलेला असून त्याची नेमणूक त्या सुभ्याच्या सुभेदाराने ( देशमुख, गव्हर्नर ) मंजूर करावी लागते. या मुखीच्या मदतीला एक सल्लागार मंडळ होते व या मंडळाचा एक एक इसम एका एका आळीने निवडलेला होता. साधारण मुलकी, फौजदारी व दिवाणी कामे या मंडळाच्या सल्लयाप्रमाणे किंवा निकालाप्रमाणे लोक कबूल करतात. वादाचा न्याय करण्यासाठी त्या व शेजारच्या आळीतील सभासदांची कमीटी नेमून निकाल करतात व हा निकाल कायद्याने मान्य ठरविलेला आहे, कित्येक गांवांत संघाचे निराळे मंडळ न निवडतां गांवचेंच मंडळ निवडतात व संघाचा फक्त मुखी निवडतात. हा मुखी त्या त्या गांवाचा कारभार त्या गांवाच्या मंडळाच्या सल्याप्रमाणे चालवितो. प्रत्येक गांवांत सारावसुली वगैरे नित्याचे सरकारी काम करण्यास एक नोकर असतो व या नोकराच्या कामावर मुखीची नजर असते. गांवचे मंडळ, गांव, अंदाजपत्रक, जमाखर्च व वादांचा निकाल यांचे फेरिस्त ठेवते व संघाच्या मंडळाच्या बैठकीत यांची फक्त चर्चा करून मंजूर करण्यांत येते. संघाच्या मंडळांतून एक कार्यकारी मंडळ निवडतात व हे कार्यकारी मंडळ तालुक्याच्या मामलतदाराशी व तो जिल्ह्याच्या सुभेदाराशी पत्रव्यवहार करतो. हे सुभेदार मध्यवर्ती सरकारशी पत्रव्यवहार ठेवतात. व याप्रमाणे दर एक घराची दाद मध्यवर्ती सरकारापर्यंत एका आठवड्यांत लागते. गांवचे संघ ही एक राजकीय सत्ता आहे. मध्यवर्ती सरकार किंवा सुभेदार वगैरे त्यांच्या राज्यकारभारांत बिलकुल हात घालीत नाहीत. पण उलट सुधारणा करणे, कारखाने काढणे रस्ते वगैरे सुखसोई करणे या कामांसाठी त्यांस पैशांची मदत करतात व त्यांस सल्ला मसलत देण्यासाठी आपले तज्ज्ञ पाठवितात. हे तज्ज्ञ येऊन इष्ट त्या सूचना करतात व त्या स्वीकारणे अगर न स्वीकारणे हे त्या संघाच्या सभासदांच्या मर्जीवर असते. गेल्या खेपेस मी जपानास गेलो तेव्हां उत्तम कामगिरी करण्याबद्दल