पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का संघस्थापना त्यांस घेरी येते व त्यामुळे दूरवर पाहण्याच्या ऐवजी पायाखाली देखील त्यांना दिसेनासे होते. संघांत एकमेकांत दळणवळण ठेवून पाणी नेहमी खेळते ठेवावें, अधिकारी नेहमी बदलून सर्वांना त्या कामाच्या तपशिलाची माहिती होईल असें करावें, नवीन नवीन विचार, नवे नवे मार्ग, नव्या नव्या रिती प्रचारांत आणून कामाला नवीनपणा आणीत जावा. प्रत्येक सभासदाला त्याच्या योग्यतेनुरूप संघांत काही तरी काम नेमून द्यावे व त्याचे काम त्याने बरोबर न केले तर संघाचे काम अड़न पडेल अशी जाणीव त्याला करून द्यावी म्हणजे प्रत्येक सभासदाला एक प्रकारचे महत्त्व येते. अमका आला नाही तर न येवो अशी बुद्धि उत्पन्न होऊ देऊ नये. प्रत्येकाला संघाच्या कामाची गोडी उत्पन्न झाली पाहिजे अशी व्यवस्था संघांत करावी. अशा रीतीने प्रत्येक सभासदाला संघाबद्दल अभि. मान, संघाच्या कामांत भाग, त्या कामाची हौस व गोडी उत्पन्न झाली म्हणजे संघाला वजन येते. शरीरांतील जसे कोणत्याहि क्षुद्र अवयवावांचन नडते व चालत नाही त्याप्रमाणे संघाचे प्रत्येक सभासदावांचन नडावें व चालं नये, असे झाले म्हणजेच प्रत्येक सभासद नियमित होतो. अमका सभासद सभेस आला नाही असे दिसले की, सर्व सभासदांनी त्याच्या घरी जावें, कां आला नाही म्हणून चौकशी करावी, बैठकीत काय काम केले ते सांगावें. इतके झाल्यावर दुसन्या खेपेस तो सभासद न कळवितां गैरहजर राहील असें होणार नाही व याप्रमाणे त्याला नियमितपणाचें शिक्षण मिळेल. संघांत आपल्यावांचून अडते हे समजेल व संघाच्या कामांत तो जास्त लक्ष घालील. संघाचे सर्व सभासद याप्रमाणे संघाच्या कामांत लक्ष घालू लागले म्हणजे संघाच्या कामाकडे लोकांचे व सरकारचेंहि लक्ष लागेल. संघाच्या सभासदांची संख्या वाढेल व त्याप्रमाणे त्याच्या म्हणण्याचे वजन पडत जाईल. वजन पडूं लागले म्हणजे त्याची उपयुक्तता दृष्टोत्पत्तीस येईल, संघाचा उपयोग दिसला की, लोक संघांत जास्त सामील होतील, कामांत लक्ष घालतील व याप्रमाणे संघाचे महत्व व कार्यक्षेत्र दिवसेंदिवस वाढतच जाईल. P ई लिन अ भा...हिं...स्व...२- कार जिसने शान