पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण सतरावें स्थानिक स्वराज्य र एका राजशासनशास्त्रज्ञाने स्वराज्य शब्दाची व्याख्या अशी केली आहे की " कोणत्याहि कामाची ज्यांना पूर्ण माहिती असावयाला पाहिजे व ज्यांना जास्तीत जास्त माहिती आहे व तें काम चांगले होण्यांत ज्यांचे अतिशय हित आहे अशा अनेक लोकांनी ते काम करणे अगर त्यावर देखरेख ठेवणे म्हणजे स्वराज्य." तसेच केंद्रीभूत राजसत्ता म्हणजे 'हातांत घेतलेल्या कामाची प्रत्यक्ष ज्यांना माहिती असण्याचा संभव नाही व ज्यांना त्याबद्दल अतिशय कमी माहिती आहे व ज्यांचे सुखदुःख त्या कामांत अत्यंत अल्प आहे अशा फार थोड्या लोकांच्या हाती तें काम करण्याचा अगर त्यावर देखरेख ठेवण्याचा अधिकार असणे. ' प्रत्येक मतदाराच्या व कायदे करणाराच्या हृदयांत ही वाक्ये कोरलेली असती तर जगांतील सर्व झोटिंगपातशाही व बरीच बेबंदशाही कधीच नाहींशी झाली असती. या जानफिस्कच्या वाक्यावरून पाश्चात्य देशांत स्वराज्य कशाला मानतात हे समजेल. तोच ग्रंथकार पुढे म्हणतो की, स्वराज्यांत अधिकारी लोकांसाठी असतात व राजेशाहीत लोक अधिकाऱ्यासाठी असतात. स्वराज्याचे योगाने लोकांची दृष्टि फांकते व त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळते परंतु प्रत्येक गोष्ट लोकांकरतां राजाने केली पाहिजे या तत्वावर उभारलेल्या राजेशाहीने लोकांची मने खुरटतात, त्यांना पारतंत्र्याची सवय लागते व ते नागरिकत्वाच्या हक्काला निरुपयोगी होतात. स्वराज्यांत लोकांवर पूर्ण विश्वास असतो व लोकांबद्दल अविश्वास हे राजेशाहाचे आद्य तत्व आहे, हे शब्द अक्षरशः कोणीहि खरे मानीत नाही तथापि प्रत्येक हिंदी गृहस्थाने या वाक्यांच्या उजेडांत आपली हिंदुस्थानची राज्यपद्धति निरखून पाहिल्यास त्यास फायदाच होईल. आपण कोण व कोठे आहोत इतके त्यास यामुळे ज्ञान झाले तर तो जागा होऊन सुधारणेच्या मार्गाला लागेल. हिंदुस्थानांत स्थानिक स्वराज्याच्या पुष्कळ संस्था